शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus; गोंदिया जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा शंभरी पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 19:38 IST

मागील पाच दिवसांत दुबई आणि दिल्लीहून जिल्ह्यात आलेल्यांपैकी एकूण ३२ जण कोरोना बाधित आढळले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आत्तापर्यंत आढळलेल्या कोरोना बाधितांचा आकडा १०१ वर पोहचला आहे.

ठळक मुद्देएकाच दिवशी १५ कोरोना बाधितांची नोंदअ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ३२ वरदिल्लीवरुन आलेल्या दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात दुबईहून परतलेल्या तिरोडा तालुक्यातील नागरिकांमुळे कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला. सोमवारी एकाच दिवशी १४ कोरोना बाधित आढळले होते. त्यानंतर मंगळवारी (दि.१६)आणखी १५ कोरोना बाधितांची नोंद झाली. यात दुबईहून १३ आणि दिल्लीहून परतलेल्या २ जणांचा समावेश आहे. मागील पाच दिवसांत दुबई आणि दिल्लीहून जिल्ह्यात आलेल्यांपैकी एकूण ३२ जण कोरोना बाधित आढळले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आत्तापर्यंत आढळलेल्या कोरोना बाधितांचा आकडा १०१ वर पोहचला आहे.१० जूनपर्यंत जिल्ह्यातील सर्व ६९ कोरोना बाधित कोरोनामुक्त झाले होते. तर दहा दिवसांच्या कालावधीत एकही नवीन कोरोना बाधित आढळला नव्हता. त्यामुळेच दोन दिवस जिल्हा कोरोनामुक्त होता. मात्र शुक्रवारी (दि.१२) दुबईहून परतलेल्या तिरोडा तालुक्यातील तीन जणांपैकी एक जण कोरोना बाधित आढळला. त्यानंतर याच व्यक्तीसह आलेले दोन जण पुन्हा कोरोना बाधित आढळले. परिणामी जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला.सोमवारी (दि.१५) एकाच दिवशी १४ कोरोना बाधित आढळले. त्यानंतर मंगळवारी पुन्हा १५ जणांच्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले.त्यामुळे पाच दिवसांच्या कालावधी जिल्ह्यात ३२ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. परिणामी जिल्हावासीयांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तिरोडा तालुक्यातील जवळपास तीनशे नागरिक दुबई येथे रोजगारासाठी गेले होते. मात्र कोरानाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे रोजगारासाठी गेलेले नागरिक आता आपल्या स्वगृही परतत आहे. मागील आठवडाभराच्या कालावधीत दुबईहून शंभरावर नागरिक परतले आहे. तर दोन दिवसांपूर्वी दिल्लीहून काही जण जिल्ह्यात दाखल झाले. या सर्वांना गोंदिया येथील एका लॉनमध्ये क्वारंटाईन करुन ठेवण्यात आले होते. यासर्वांचे स्वॅब नमुने घेवून ते गोंदिया येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी रविवारपर्यंत एकूण तीन जणांचे स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले होते. सोमवारी एकाच दिवशी १४ आणि आज (दि.१६) १५ जणांचे स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे दुबईहून परतलेल्यांपैकी आतापर्यंत ३० जणांचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. तर दिल्लीहून परतलेल्या दोन जणांचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे मंगळवारी एकाच दिवशी १५ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर ४५ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.जिल्ह्यात आत्तार्पंत एकूण १०१ कोरोना बाधितांची नोंद झाली असून यापैकी ६९ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहेत. जिल्ह्यात दुबईहून परतलेल्या तिरोडा तालुक्यातील नागरिकांमुळे कोरोनाचा उदे्रक झाल्याचे चित्र आहे.तिरोडा तालुका सेफतिरोडा तालुक्यातील बरेच नागरिक दुबई येथे रोजगारासाठी गेले होते. मात्र लॉकडाऊनमुळे आता आपल्या स्वगृही परतत आहेत. मात्र जिल्हा प्रशासनाने बाहेरील, जिल्हा, राज्य आणि विदेशातून परतलेल्या नागरिकांना गोंदिया येथील शासकीय क्वारंटाईन कक्षात दाखल करुन त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जात आहे. या लोकांचा तिरोडा तालुक्यातील नागरिकांशी संपर्क न आल्याने या तालुक्यात संसर्ग झाला नसून तिरोडा तालुका पूर्णपणे सेफ आहे.१३१६ स्वॅब नमुन्यांची तपासणीकोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत एकूण १३१६ लोकांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यापैकी आतापर्यंत एकूण १०१ स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर १२१७ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर ....... नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस