जिल्ह्यात रविवारी आढळलेल्या २१ कोरोनाबाधितांमध्ये सर्वाधिक १२ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा १, गोरेगाव १, आमगाव ६ आणि सडक अर्जुनी तालुक्यातील १ रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात सुरुवातीला कोरोनाबाधितांची संख्या तीन आकड्यांत वाढत असल्याने जिल्हावासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले शिवाय ग्रामीण भागातसुद्धा रुग्ण झपाट्याने वाढत होते त्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती. पण १ जानेवारीपासून कोरोना रुग्णवाढीला बऱ्याच प्रमाणात ब्रेक लागला आहे. काेरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत ५९२३१ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ४७७७७ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजेन टेस्ट केली जात असून ६१४४१ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यात ५५४५० जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १३९१२ कोरोनाबाधित आढळले असून यापैकी १३४७० जणांनी मात केली आहे. सद्य:स्थितीत २६३ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून २६ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.
कोरोना रुग्णांची संख्या येतेय आटोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:16 IST