शहरं
Join us  
Trending Stories
1
बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
4
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
5
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
6
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
7
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
8
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
9
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
10
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
11
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
12
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
13
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
14
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
15
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
16
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
17
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  
18
महालक्ष्मी योगात नागपंचमी: ८ राशींवर शिव-लक्ष्मी कृपा, अपार धन-धान्य-लाभ; सुबत्ता-कल्याण काळ!
19
Mangalagauri 2025: मंगळागौरीचे सौभाग्यदायी व्रत कसे केले जाते? जाणून घ्या संपूर्ण पूजाविधी
20
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?

जिल्ह्यात स्क्रब टायफसच्या रूग्णांची संख्या तीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 21:55 IST

सद्यस्थितीत सगळीकडे स्क्रब टायफस या आजाराने पाय पसरले आहे. गोंदिया जिल्ह्यात या आजाराचे तीन रूग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यामुळे जिल्हावासीयांतही दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देजिल्हावासीयांत दहशतीचे वातावरण : आरोग्याची काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सद्यस्थितीत सगळीकडे स्क्रब टायफस या आजाराने पाय पसरले आहे. गोंदिया जिल्ह्यात या आजाराचे तीन रूग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यामुळे जिल्हावासीयांतही दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम जानव्हा येथील सत्यभामा मेंढे (४५) यांना २६ आॅगस्ट रोजी हा आजार असल्याचे स्पष्ट झाले. त्यांना भंडारा येथील प्रयास हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. बोंडगाव येथील तेजस्वीनी एम. हटवार (२०) या महिलेला १ सप्टेंबर रोजी हा आजार असल्याचे स्पष्ट झाले. त्यांना नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.तर सालेकसा तालुक्यातील ग्राम गोर्रे येथील कुवरलाल जी. बिसेन (४६) यांना ६ सप्टेंबर रोजी हा आजार असल्याचे स्पष्ट झाले. त्यांना येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. स्क्रब टायफस या जीवाणूचे नाव ओरीयंटा टूशूगामुशी असे आहे. अफगानीस्तान, पाकीस्तान, रशीया, जपान, ब्रम्हदेश आणि भारतात तो आढळतो. भारतात हिमाचल प्रदेशमध्ये या आजाराचे रूग्ण प्रामुख्याने आढळतात. अलीकडे उत्तरप्रदेश व महाराष्ट्रात या आजाराचे तुरळक रूग्ण आढळले होते.अशी आहेत स्क्रब टायफसची लक्षणेस्क्रब टायफसच्या आजार कीटक चावल्याने होतो. कीटक ज्या ठिकाणी चावतो त्या ठिकाणी छोटासा अल्सर तयार होतो. ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी, लिंफ नोड सुजणे, कोरडा खोकला, अंगावर रॅश उठणे, न्युमाोनिया, मेंदूज्वर सदश लक्षणे या आजाराची असतात.असा करावा उपचारशेतकरी, शेतात काम करणारे मजूर, जंगलात गाई चारणारे गुराखी यांना हा आजार होण्याची जास्त शक्यता असते. यावर माईट नियंत्रणासाठी कीटकनाशकाचा वापर करावा, झाडेझुडपात काम करताना पूर्ण बाह्यांचे पायघोळ कपडे वापरावेत, कपडे, अंथरून पांघरूणावर किटकनाशक औषधांचा वापर करावा, खुल्या जागेत शौचास जाणे टाळावे, झाडझुडूपात काम करून आल्यावर कपडे गरम पाण्यात भिजवून धुवावेत, स्क्रब टायफसचे रूग्ण आढळून आलेल्या रूग्णांच्या घराच्या अवती-भवती असलेली झाडे झुडूप काढून टाकावीत, चिगार आढळून आलेल्या ठिकाणी जमिनीची नांगरणी तसेच जमिनीवरील सर्व पालापाचोळा जाळून टाकावा पाळीव प्राणी व पोल्ट्री बर्डस असलेल्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवाव्या.घरासभोवतालची झाडे झुडपे काढून टाकावीत. मॅलेथीओन, लिंडान, डी.डी.टी पावडरचा शिडकाव करणे, माईटसचा (चिगर) प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी जाणे टाळावे. खुल्या जागेत शौचास जाऊ नये, पूर्ण शरीर झाकल्या जाईल असे कपडे वापरावेत तसेच किटक रिपेलंट क्रीमचा वापर करावा.डॉ. भुमेश्वर पटलेसाथरोग अधिकारी, जि.प. गोंदिया.

टॅग्स :Healthआरोग्य