लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात सोमवारी एकाच दिवशी १४ तर मंगळवारी (दि.१६) १५ कोरोना बाधितांची नोंद झाली. तर बुधवारी पुन्हा एका जणाचा स्वॅब नमुन्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सहा दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील अॅक्टीव्ह कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ३३ वर पोहचला आहे. जिल्ह्यात दुबई आणि दिल्लीहून आलेल्या नागरिकांमुळे पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला.जिल्ह्यात २६ मार्चला पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर हा रुग्ण १० एप्रिलला कोरोनामुक्त झाला. त्यानंतर जिल्हा ३९ दिवस कोरोनामुक्त होता. केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊनमुळे विविध राज्यात अडकून असलेल्या नागरिकांना त्यांच्या स्वगृही परतण्याची परवानगी दिली. त्यामुळे बाहेरुन आलेल्या नागरिकांमुळे १९ मे रोजी गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला. त्यानंतर आठ ते दहा दिवसांच्या कालावधीत कोरोना बाधितांचा आकडा ६८ वर पोहचला होता. २१ दिवसांच्या कालावधीत हे सर्व कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले. त्यामुळे १० जूनला जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त झाला होता. मात्र दुबईहून तिरोड्यातील शंभराहून अधिक नागरिक परतले. यापैकी तीन जणांचे स्वॅब नमुने रविवारपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आले. तर सोमवारी (दि.१५) एकाच १४ आणि मंगळवारी दुबईहून परतलेल्या १५ जणांचे स्वॅब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. तर आज (दि.१७) पुन्हा एका जणाचा नमुना कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने जिल्ह्यातील अॅक्टीव्ह कोरोना बाधितांचा आकडा सहा दिवसांच्या कालावधीत ३३ वर पोहचल्याने जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याचे चित्र आहे. यामुळे जिल्हावासीयांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने आतापर्यत आढळून आलेले सर्व कोरोना बाधित हे बाहेरुन आलेले असून जिल्ह्यातील एकही कोरोना बाधित नाही. त्यामुळे जिल्हावासीयांसाठी ही निश्चितच दिलासादायक बाब आहे. जिल्ह्यातील आत्तापर्यंतच्या एकूण कोरोना बाधितांची संख्या १०२ वर पोहचली आहे. यापैकी ६९ कोरोना बाधित कोरोनामुक्त होवून आपल्या घरी परतले आहेत.१२६४ नमुने कोरोना निगेटिव्हकोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत एकूण १४२२ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी १०२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर १२६४ स्वॅब नमुने हे कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर ५६ स्वॅब नमुन्यांचा अहवाल गोंदिया येथील प्रयोगशाळाकडून जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे.शासकीय क्वारंटाईन कक्षात १०६० जणकोरोना संसर्गाच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बाहेरील जिल्हा आणि राज्यातून येणाऱ्यांना शासकीय क्वारंटाईन कक्षात दाखल केले जात आहे. जिल्ह्यातील विविध शासकीय क्वारंटाईन सेंटरमध्ये सध्या स्थितीत १०६० आणि होम क्वारंटाईमध्ये १६६६ असे एकूण २७२६ जण क्वारंटाईन आहेत.प्रयोगशाळेमुळे स्वॅब नमुने तपासणीची संख्या वाढलीगोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने तपासणी प्रयोगशाळा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे नमुन्यांचा चाचणी अहवाल सुध्दा लवकर प्राप्त होत आहे. तर येथे प्रयोगशाळा सुरू झाल्याने स्वॅब नमुने तपासणीचे प्रमाण सुध्दा वाढविण्यात आले असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठात डॉ.व्ही.पी.रुखमोडे यांनी सांगितले.
जिल्ह्यात अॅक्टीव्ह कोरोना बाधितांचा आकडा ३३ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 05:00 IST
जिल्ह्यात २६ मार्चला पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर हा रुग्ण १० एप्रिलला कोरोनामुक्त झाला. त्यानंतर जिल्हा ३९ दिवस कोरोनामुक्त होता. केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊनमुळे विविध राज्यात अडकून असलेल्या नागरिकांना त्यांच्या स्वगृही परतण्याची परवानगी दिली. त्यामुळे बाहेरुन आलेल्या नागरिकांमुळे १९ मे रोजी गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला.
जिल्ह्यात अॅक्टीव्ह कोरोना बाधितांचा आकडा ३३ वर
ठळक मुद्देएकूण कोरोना बाधितांची संख्या १०२ : बाहेरुन आलेल्यांमुळे वाढला संसर्ग