शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
3
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
4
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
5
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
6
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
7
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
8
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
9
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
10
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
11
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
13
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
14
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
15
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
16
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
17
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
18
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
19
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
20
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले

जि.प.सदस्यांचा अधिकारासाठी आता न्यायालयीन लढा सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2022 05:00 IST

१९ जानेवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यानंतर पंधरा दिवसात जि. प. अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतीपदाची निवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र याला आता तीन महिन्याचा कालावधी लोटूनही या निवडणुका घेण्यात आल्या नाही. त्यामुळे निवडून आलेल्या जिल्हा परिषदेच्या ५३ आणि पंचायत समितीच्या १०८ सदस्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित राहावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन तीन महिन्याचा कालावधी लोटला मात्र अध्यक्ष आणि सभापती पदाची निवडणूक अद्यापही घेण्यात आली नाही. त्यामुळे निवडून आलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत सदस्यांच्या अधिकारांचे हनन होत आहे. शासनाने यावर अद्यापही तोडगा न काढल्याने निवडून आलेल्या २६ जि. प. सदस्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ४ एप्रिलला याचिका दाखल केली आहे. गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आधीच कोरोनामुळे दीड वर्ष लांबणीवर गेली होती. त्यानंतर डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात निवडणुका पार पडल्या. १९ जानेवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यानंतर पंधरा दिवसात जि. प. अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतीपदाची निवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र याला आता तीन महिन्याचा कालावधी लोटूनही या निवडणुका घेण्यात आल्या नाही. त्यामुळे निवडून आलेल्या जिल्हा परिषदेच्या ५३ आणि पंचायत समितीच्या १०८ सदस्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित राहावे लागत आहे. आठ पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत मागील दोन वर्षांपासून प्रशासकराज सुरू असून ग्रामविकास विकासाला सुद्धा ब्रेक लागला आहे. कुठलेही कारण नसताना ग्रामविकास विभागाकडून या निवडणुका लांबणीवर टाकल्या जात आहे. या सर्व प्रकाराला कंटाळून भाजपच्या २६ जि. प. सदस्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात राज्य सरकार विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यामुळे सदस्यांनी आता आपल्या अधिकारांसाठी न्यायालयीन लढा सुरू केल्याचे चित्र आहे. 

 हा तर लोकशाहीचा अवमान - निवडून आलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवणे म्हणजे हा लोकशाहीचा अवमान आहे. राज्य सरकारच्या अशा धोरणामुळे लोकशाहीचा ढाचा ढासळेल अशी संतप्त प्रतिक्रिया जि. प. सदस्य संजय टेंभरे, पंकज रहांगडाले, माधुरी रहांगडाले, लायकराम भेंडारकर, डॉ. लक्ष्मण भगत यांनी दिली. आता लक्ष याचिकेच्या सुनावणीकडे - जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकीचा तिढा अद्यापही सुटला नसल्याने जिल्हा परिषद सदस्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आता पुढील आठवड्यात सुनावणी होणार असल्याने त्याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

काय आहे अडचणस्थानिक स्वराज्य संस्थामधील २७ टक्के ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. त्यामुळे ओबीसी जागा जनरल करून जिल्हा परिषदेची निवडणूक घेण्यात आली. मात्र आरक्षण रद्द होण्यापूर्वी जि. प. अध्यक्ष आणि पं. स. सभापतीपदाचे आरक्षण जाहीर झाले होते. त्यामुळे जुन्याच आरक्षणानुसार निवडणूक घ्यायची की, नव्याने आरक्षण काढायचे असा पेच जिल्हा निवडणूक विभागापुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांनी ग्रामविकास विभागाकडे यावर मार्गदर्शन मागविले आहे. पण ग्रामविकास विभागाने यावर मागील तीन महिन्यापासून कुठलेच उत्तर दिले नाही. त्यामुळे निवडणुकीचा पेच कायम आहे.  

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद