शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

आता शिक्षकांना लावावी लागणार बायोमेट्रिकवर हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 17:51 IST

शिक्षण विभागाचा आदेश : शाळेतून सुट्टी मारणे शिक्षकांना होणार आता अवघड

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : राज्यातील अनुदानास पात्र शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांची उपस्थिती तत्काळ बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे नोंदवण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. तसेच बायोमेट्रिक प्राणाली अवयव चेहरा ओळख प्रणालीद्वारे उपस्थितीची अट पूर्ण करण्यासाठी सर्व अंशतः अनुदानित शाळांना देण्यात आलेल्या मुदतीचे पालन न करणाऱ्या शाळांचे वेतन अनुदान रोखून ठेवण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. शाळेत उपस्थित विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी घेण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. सर्व शाळांना बायोमेट्रिक मशीन देण्यात आल्या आहेत. आता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची हजेरीही बायोमेट्रिक पद्धतीने घेतली जाणार आहे. राज्यातील सर्व अनुदान पात्र शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिक प्रणाली किंवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे नोंदविण्याचे आदेश राज्य सरकारने ऑक्टोबर २०२४ मध्ये दिले आहेत.

गुरू अन् शिष्याचीही हजेरी बायोमेट्रिकवर! शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रिकवर घेतली जाणार आहे. ही हजेरी बंधनकारक असून शाळेला सुट्टी मारणाऱ्यांची मात्र मोठी अडचण होणार आहे.

बायोमेट्रिकवर चेहरा दाखवा हजेरी लावा शाळेत आता विद्यार्थी असो किंवा शिक्षक असो त्यांना हजेरी लावण्यासाठी प्रत्येक शाळेत बायोमेट्रिक मशीन बसविण्यात येणार आहे. त्याशिवाय हजेरी लागणार नाही.

शासनाला नव्या नियमाची गरज का भासली? शाळेत येणारे विद्यार्थी अनेकदा शाळा बुडवून बाहेर जातात. तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीही असेच वागतात. मात्र, हजेरी शंभर टक्के दाखवली जाते. ही बाब शिक्षण विभागाच्या लक्षात आल्याने अंशतः अनुदान प्राप्त शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आलेली आहे. त्यामुळे सुट्टी मारणाऱ्या शिक्षकांना आता पूर्णवेळ शाळेतच राहावे लागणार असल्याचा हा निर्णय आहे.

अपडेट द्यावे लागेल शाळांमध्ये विद्यार्थी, कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी शिक्षण विभागाकडे संबंधितांना द्यावी लागणार आहे. अपडेट हजेरी दिल्यानंतरच अनुदान मंजुरी, पगार आदींबाबत विचार होणार आहे.

शासनाला नव्या नियमाची गरज का भासली? शाळेत येणारे विद्यार्थी अनेकदा शाळा बुडवून बाहेर जातात. तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीही असेच वागतात. मात्र, हजेरी शंभर टक्के दाखवली जाते. ही बाब शिक्षण विभागाच्या लक्षात आल्याने अंशतः अनुदान प्राप्त शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आलेली आहे. त्यामुळे सुट्टी मारणाऱ्या शिक्षकांना आता पूर्णवेळ शाळेतच राहावे लागणार असल्याचा हा निर्णय आहे.

अनुदानाला लागणार कात्री विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आलेली असताना आता अनुदानास पात्र शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही बंधनकारक करण्यात आलेली आहे. बायोमेट्रिक हजेरी नसेल तर शाळेच्या अनुदानाला कात्री बसणार आहे.

अनेकांची वाढली अडचण काही शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी शाळेत न येता आपले घरगुती काम करीत असतात. अशा शिक्षकांची आता अडचण वाढली आहे.

हा नियम कोणत्या शाळांसाठी? राज्यातील अनुदानास पात्र शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी हा नियम लागू असणार आहे.

 

टॅग्स :gondiya-acगोंदिया