शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

प्याऊंवरही आता ‘सेल्फ सर्व्हिस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 20:31 IST

आजी आजोबा म्हणायचे ‘पाणी पाजण्याएवढे मोठे पुण्य नाही’. मात्र बदलत्या काळानुरूप त्यांची ही म्हण देखील बदलली आहे. आज पाण्याच्या पुण्याची व्याख्या बदलून ‘पाणी उपलब्ध करवून देण्याएवढे मोठे पुण्य नाही’ अशी झाली आहे.

ठळक मुद्देपाणी व ग्लास उपलब्ध : हाताने घ्या व प्या पाणी

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आजी आजोबा म्हणायचे ‘पाणी पाजण्याएवढे मोठे पुण्य नाही’. मात्र बदलत्या काळानुरूप त्यांची ही म्हण देखील बदलली आहे. आज पाण्याच्या पुण्याची व्याख्या बदलून ‘पाणी उपलब्ध करवून देण्याएवढे मोठे पुण्य नाही’ अशी झाली आहे. यामुळेच आज प्याऊंवर पाणी पाजण्यासाठी कुणी दिसत नसून ‘सेल्फ सर्वीस’ची प्रथा सुरू झाली आहे. आता प्याऊंवर पाणी व ग्लास उपलब्ध करवून दिले जात असून आपल्या हातून पाणी घ्या व प्या हा फंडा लागू झाला आहे.काळ बदलत चालला आहे व त्यानुसार रिती व परंपराही बदलत चालल्या आहेत. पूर्वी लग्नाचे मंगलाष्टक म्हणण्यासाठी भटजींना बोलवावे लागत होते. आज नवीन काळात मात्र कॅसेट लावून भटजींचे काम उरकले जात आहे. प्रत्येकच बाबतीत नवनवीन संकल्पना काम करू लागली असून त्यालाच आपण ‘अ‍ॅडव्हान्स’ झालो अशी गोड उपमा देत आहोत. यातूनच काळ खरच बदलत गेल्याचेही दिसून येते.बदलत्या काळात प्याऊंची (पाणपोई) संस्कृतीही बदलून गेली आहे. पूर्वी आजी आजोबा म्हणायचे ‘पाणी पाजण्याएवढे मोठे पुण्य नाही’ त्यानुसार तहानलेल्यांना स्वत: हाताने पाणी दिले जायचे. पाण्याचे हे पुण्य कमाविण्यासाठी प्याऊंवर एक व्यक्ती हजर राहून आपल्या हाताने लोकांना पाणी देत असे. पुण्य कमाविण्यासाठी ही धडपड केली जात होती. त्यामुळे प्रत्येकच प्याऊवर एका व्यक्तीची ड्यूटी लावली जात होती.मात्र काळ बदलला असून कुणालाही कुणासाठी वेळ उरलेला नाही. त्यामुळे पाण्याच्या पुण्याची ही व्याख्याही आजच्या पिढीने मोठ्या हुशारीने बदलून टाकली आहे. आज ‘पाणी उपलब्ध करवून देण्याएवढे पुण्य नाही’ अशी म्हण प्रचलीत झाली आहे. कारण वास्तविक प्याऊंची संख्या घटत चालली आहे. त्यातही जी प्याऊ दिसताहेत त्यावर पाणी देण्यासाठी कुणी दिसत नाही. प्याऊ आता ‘सेल्फ सर्वीस’ तत्वावर चालत आहेत.त्याचे असे की, पाण्याचे पुण्य कमाविण्यासाठी आज लोकांकडून घरांसमोर किंवा गर्दीच्या जागेवर पाण्याचे मडके किंवा रांजण भरून ठेवली जात आहे.तेथे पाण्याचे ग्लास उपलब्ध करवून दिले जातात. ज्याला कुणाला पाणी प्यायचे असेल त्याला स्वत: पाणी घेऊन प्यायचे आहे. एकंदर ‘सेल्फ सर्व्हिस’ चा फंडाच आता प्याऊंवर अंमलात आणला जात असल्याचे दिसून येत आहे.प्याऊंवरील ग्लासलाही हतकडीप्याऊंवर पाणी देण्यासाठी कुणी हजर राहत नाही. त्यामुळे स्वत: पाणी घ्या व प्या अशी पद्धत सुरू झाली आहे. अशात मात्र पाणी पिण्यासाठी ठेवलेले ग्लास चोरीला जातात. यावर तोडगा म्हणून ग्लासेसलाही हतकडी लावली जाते. त्याचे असे की, ग्लास चोरीला जाऊ नये यासाठी ग्लासला लोखंडी साखळीने बांधून ठेवले जाते.

टॅग्स :Waterपाणी