शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

भरडाईसाठी धानाची उचल नाही, ३४ राईस मिलर्सला बजावल्या नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 17:05 IST

सहा राईस मिलर्सनी जमा केली बँक गॅरंटी; पण अद्याप धानाची उचल नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासकीय धान खरेदी केंद्रांवर खरेदी करण्यात आलेल्या धानाची भरडाई करून तांदूळ जमा करण्यासाठी करारनामे करून भरडाई न करणाऱ्या ३४ राईस मिलर्सला जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावित काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला. यानंतर ३४ पैकी ६ राईस मिलर्सनी बँक गॅरंटी जमा करून धानाची भरडाई करण्याची तयारी दर्शविली आहे; पण अद्यापही धानाची उचल केली नसल्याची माहिती आहे.

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत सहकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्रांवरून हमीभावाने धान खरेदी केली जाते. यानंतर खरेदी केलेल्या धानाची भरडाई करून तांदूळ जमा करण्यासाठी राईस मिलर्ससह करार केला जातो; पण गेल्या सहा महिन्यांपासून राईस मिलर्स आणि शासन यांच्या भरडाई व वाहतुकीचे दर आणि करारनाम्यातील अटी-शर्तीवरून वाद सुरू आहे. या वादावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेला ४० लाख क्विंटल धान तसाच पडून आहे. बऱ्याच प्रमाणात धान उघड्यावर पडून असल्याने तो खराब होण्याची शक्यता आहे. तर यामुळे रब्बीतील धान खरेदीसुद्धा अडचणीत आले आहे. खरिपातील धानाची भरडाई करण्यासाठी जिल्ह्यातील ३४ राईस मिलर्सने करारनामे केले होते; पण त्यांनी अद्यापही धानाची भरडाईसाठी उचल केली नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या ३४ राईस मिलर्सला काळ्या यादीत टाकण्याची नोटीस बजाविली आहे. नोटीस हातात पडताच यापैकी सहा राईस मिलर्सने बैंक गँटी जमा करून भरडाईसाठी धानाची उचल करण्याची तयारी दर्शविल्याची माहिती आहे. तर उर्वरित राईस मिलर्ससुद्धा आता तयारीला लागले असल्याची माहिती आहे.

२९६ राईस मिलर्स करतात करारजिल्हा मार्केटिंग फेडरेशनअतर्गत खरिपात ४० लाख क्विंटलपर्यंत धान खरेदी केली जाते. त्यानंतर या धानाची भरडाई करण्यासाठी दरवर्षी २९६ राईस मिलर्ससह करार केला जातो. त्यामुळे वेळेत धानाची भरडाई करूनरब्बीतील धान खरेदी वेळेत सुरू करण्यास मदत होते; पण यंदा केवळ ३४ राईस मिलर्सने करार केले असल्याने खरेदी केलेल्या संपूर्ण धानाची भरडाई कशी होणार, असा प्रश्न आहे.

आचारसंहिता संपल्यानंतरच निर्णयशासनाने राईस मिलर्सच्या मागण्यांवर तोडगा काढण्यास विलंब केला. त्यातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आता हा निर्णय लांबणीवर पडला. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपेपर्यंत राईस मिलर्सच्या मागण्यांवर तोडगा निघण्याची शक्यता कमी असून, तोपर्यंत यावर निर्णय होण्याची शक्यता कमी आहे. 

टॅग्स :gondiya-acगोंदिया