शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

ना-मान, ना-धन; जगायचं कसं? वृद्ध कलावंत व साहित्यिकांना हवा आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 15:45 IST

कलावंताना हवा आधार : मानधन वाढ व नियमित मिळणे गरजेचे

नरेश रहिले लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : वृद्ध कलावंत व साहित्यिकांना आधार व्हावा, यासाठी राज्य शासनाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ज्येष्ठ नाट्यकलावंतांना महिन्याला मानधन मिळत आहे. मात्र, ज्या कलावंतांनी गेल्या एक-दीड वर्षात प्रस्ताव सादर केले अशांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत.

यंत्रणाच उदासीननाटक, दंडार, तमाशा तसेच इतर जनजागृतीपर कार्यक्रमात कला दाखवून प्रबोधन करणाऱ्या कलावंतांना शासनाच्या योजनेंतर्गत मानधन सुरू करण्याची योजना अंमलात आणण्यात आली. ही योजना सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभा- गामार्फत राबविली जात आहे.

आता पाच हजार रुपये मानधनराज्य शासनाने काही महिन्यांपूर्वी कलावंतांच्या मानधन वाढीचा निर्णय घेतला. त्यानुसार आता कलावंतांना पाच हजार रुपयांचे मानधन मिळत आहे. पूर्वी हेच मानधन अडीच हजार रुपये मिळत होते.

कलावंतांना द्या मानधन राज्य शासनाच्या सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा, पर्यटन, विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक, कलावंत मानधन योजना राबविली जाते. यामध्ये वर्गवारीनुसार कलावंतांना मानधन दिले जाते. राष्ट्रीय स्तरावर योगदान देणाऱ्या कलावंतांना 'अ' दर्जा, राज्य पातळीवर योगदान देणाऱ्या कलावंतांना 'ब' दर्जा, तर जिल्हास्तरावर योगदान देणाऱ्या कलावंतांना 'क' दर्जा देऊन त्यानुसार मानधन अदा केले जाते. यासाठी ५० वर्षापेक्षा वय अधिक असावे.

असे आहेत मानधन लाभाचे निकषराज्य शासनाच्या सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा, पर्यटन विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक, कलावंत मानधन योजना राबविली जाते. यामध्ये वर्गवारीनुसार कलावंतांना मानधन दिले जाते. 

"सन्मान योजनेसाठी मी दोन महिन्यांपूर्वी प्रस्ताव सादर केला. प्रस्ताव अजूनही मंजूर झाला नाही. समितीची बैठक होत नसल्याने अडचण आहे."- भागरथा भांडारकर, भजनी मंडळ-पदमपूर

"योजनेचा लाभ मला पाच वर्षांपासून मिळत आहे. मात्र, वाढीव मानधन अजूनही मिळाले नाही. या योजनेमुळे मोठा आधार मिळाला."- परसराम हुकरे, कलावंत-पदमपूर 

"राज्य शासनाने काही महिन्यांपूर्वी कलावंतांच्या मानधन वाढीचा निर्णय घेतला. त्यानुसार आता कलावंतांना पाच हजार रुपयांचे मानधन मिळत आहे. पूर्वी हेच मानधन अडीच हजार रुपये मिळत होते. निकषात बसत असलेल्या कलावंतांची निवड करून समितीमार्फत निवड केली जाते." - अध्यक्ष-वृद्ध जीवनलाल लंजे, कलावंत समिती

 

टॅग्स :gondiya-acगोंदिया