शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

निवडणूक भत्ता नाहीच

By admin | Updated: July 30, 2015 01:37 IST

संपूर्ण जिल्हाभर गेल्या पाच वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणुकीचे मानधन शिक्षकांना मिळाले नसल्याने सर्वांमध्ये असंतोष पसरला आहे.

शिक्षकांमध्ये संताप : आशेवर फिरले पाणीकाचेवानी : संपूर्ण जिल्हाभर गेल्या पाच वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणुकीचे मानधन शिक्षकांना मिळाले नसल्याने सर्वांमध्ये असंतोष पसरला आहे. जवळपास १ कोटी १० लाख रुपयांचे मानधन थकित असल्याचे सांगितले जात आहे.पूर्वी शिक्षकांना या कामाचे मानधन दिले जात नव्हते. त्यामुळे शिक्षक संघटनांनी विरोध दर्शविला होता. त्यावर काही अधिकाऱ्यांनी यावेळी निवडणूक भत्ता (मानधन) रोख स्वरूपात मिळणार असल्याचे सांगितले, मात्र प्रत्यक्षात तसे झालेच नाही.रोख स्वरूपात लगेच मानधन मिळेल या आशेने निवडणूक मतदान अधिकारी म्हणून मतदान केंद्रावर जाताना शिक्षकांसह इतर कर्मचारी खुशीचे होते. मतदानाच्या दिवशी शेवटपर्यंत भत्ता मिळणार असल्याची आशा त्यांनी ठेवली आली. शेवटी साहित्य जमा करताना आपल्याला भत्ता मिळणार अशी आशा सर्वांना होती. मात्र ती आशा निराशेत बदलले. शेवटी नाराज होवून शिक्षकांना खिशातील पैसे खर्च करुन परतावे लागले. आश्चर्याची बाब अशी की, मतदान साहित्य शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या हाती सोपविताना निवडणूक भत्ता मिळणार असल्याचे चॉकलेट देण्यात आले होते. विशेष म्हणजे निवडणूक कामात असलेल्या शिक्षकांना महसूल कर्मचारी असभ्य वागणूक देतात, अपशब्दाचा वापर करतात. तसेच क्षुल्लक कारणाकरिता कारवाई करण्यात येईल, बरखास्त करण्यात येईल, निलंबित करण्यात येईल अशा धमक्या दिल्या जातात असा अनेक शिक्षकांचा अनुभव आहे. तरीही राष्ट्रीय कर्तव्य समजून शिक्षक या कामात सहभागी होतात.निवडणूक भत्ता त्वरित देण्यात आला नाही तर यानंतरच्या निवडणुकांच्या कामावर बहिष्कार टाकणार असल्याचे काही शिक्षकांनी सांगितले. (वार्ताहर)तरीही शिक्षकांनी बाळगला संयममहिनाभरापूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गटशिक्षणाधिकारी सुनील मांढरे यांची याच मुद्द्यावरून उपविभागीय अधिकाऱ्यांशी बाचाबाची झाली होती. याचा राग शिक्षकांत होता. तरीपण शिक्षकांनी संयम बाळगला. साहित्य जमा करण्याच्या वेळी निवडणूक भत्यावरुन वादंग निर्माण झाला असता, मात्र त्याला थांबविण्यात काही शिक्षकांना यश आले.