शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया स्थानकावर नऊ कोटींची कामे

By admin | Updated: May 27, 2015 01:01 IST

मागील दोन वर्षांपासून गोंदिया रेल्वे स्थानकावर १६ कोटी रूपयांचे बांधकाम करण्यात आले.

गोंदिया : मागील दोन वर्षांपासून गोंदिया रेल्वे स्थानकावर १६ कोटी रूपयांचे बांधकाम करण्यात आले. तसेच नऊ कोटी रूपयांचे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असून त्यात एस्कलेटर, लिफ्टच्या सोयीसह सीसीटीव्ही कॅमेरांमध्येही वाढ होणार असल्याची माहिती दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे नागपूर विभागीय व्यवस्थापक आलोक कंसल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.२६ मे ते ९ जूनपर्यंत आयोजित रेल्वे प्रवासी पंधरवड्याच्या उद्घाटन समारंभासाठी कंसल येथे आले होते. नऊ कोटी रूपयांच्या विकास कामांबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, प्लॅटफार्म-२ वर दोन एस्कलेटर्स लावण्यात येतील. याशिवाय प्लॅटफार्म-३ वर दोन लिफ्ट व प्लॅटफार्म-१ वर एक लिफ्ट लावण्यात येत आहे. लिफ्ट लावण्यासाठी कामाचा शुभारंभ झालेला आहे. प्लॅटफार्म-१ होम प्लॅटफॉर्म असून त्यावर पूर्ण शेड लागले नाही ते काम लवकरच पूर्ण करण्यात येईल.गोंदिया-बल्लारशा रेल्वे लाईनवरील १६ स्थानकांपैकी ५ स्थानकांवर विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. जेथे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे तेथे अडीच एचपीचा करंट देण्यात आला आहे. त्यामुळे विद्युत तारांची चोरी होऊ शकणार नाही. हे संपूर्ण विद्युतीकरण २०१७ पर्यंत पूर्ण होऊन या मार्गावरील रेल्वेगाड्या ११० किमी प्रतितास वेगाने धावू शकतील, असे त्यांनी सांगितले.रेल्वेने सुरक्षेवर अधिक लक्ष देणे सुरू केले आहे. जर सुरक्षेच्या संदर्भात काही कमतरता दिसून आली तर १८२ क्रमांक डायल केला जावू शकतो. ट्रेनमध्ये जर स्वच्छतेबाबत काही समस्या असेल तर १३८ क्रमांक डायल केल्यावर ती समस्या सुटू शकेल असेही कंसल यांनी सांगितले. नागपूरवरून गोंदियाला येताना ट्रेनमध्ये त्यांनी आज (मंगळवारी) अनेक प्रवाशांना त्यांच्या समस्या विचारल्या व त्यांचे निवारण करण्याचा प्रयत्नसुद्धा केला. त्यांनी सांगितले की, गोंदिया रेल्वे स्थानकावर आधीचे ३० सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत. परंतु पुढील सहा महिन्यांत आणखी १३ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील. याशिवाय रेलटोली परिसरातील बुकिंग कार्यालय भवनाला विस्तारित करण्यात येईल. जनसाधारण बुकिंग सेवा प्रवाशांसाठी करण्यात आली आहे. गोंदिया शहरात सात ठिकाणी खासगीरीत्या ही बुकिंग सेवा देण्यात आली आहे. त्यात केवळ एक रूपया प्रतितिकीट अधिक घेवून तिकीट उपलब्ध करून दिले जात आहे. भंडारा येथील पोस्ट आॅफिसमध्येसुद्धा ही सेवा उपलब्ध आहे. आता मोबाईलवरही सामान्य तिकीट उपलब्ध करवून दिले जात आहे.गोंदिया स्थानकावर वॉटर रिसायकलिंग प्लँट लावण्याची योजना आहे. घाण अधिक पसरू नये यासाठी रेल्वे गाड्यांमध्ये डस्टबीन ठेवण्यात येतील. नागपूर ते दुर्ग दरम्यान रेल्वेगाड्या वेळेवर धावतात किंवा नाही, हे बघण्यासाठी ६ ते ८ अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. ते रेल्वेगाड्यांच्या इंजिनमधून प्रवास करतात. गोंदिया रेल्वे स्थानकाच्या बुकिंग कार्यालयासमोर बनविण्यात आलेले शॉपिंग कॉम्प्लेक्सबाबत निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून हे काम ६ महिन्यात पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)महिला व बालकांसाठी विशेष सोयरेल्वेने समाजसेवेची जबाबदारीसुद्धा घेतली आहे. ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी रेल्वे गाड्यांमध्ये भटकलेल्या महिला व बालकांसाठी एक सेल बनविण्यात आला आहे. गोंदिया रेल्वे स्थानकावर चाईल्ड केअर कमिटीने सन २०१४ मध्ये ३६ बालकांना चाईल्ड हेल्प लाईनला सोपविले आहे. त्यातच १४ बालकांना त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचविण्यात आले आहे. सन २०१५ मध्ये २८ बालकांना त्यांच्या पालकांपर्यंत पोहचविण्यात आले आहे. प्लॅटफॉर्म-३ व ४ वर एका विशेष खोलीत त्यांना सुरक्षित राहण्याची व्यवस्था आहे. तिथे त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली जाते व त्यांची देखरेख तसेच देखभालीसाठी महिला पोलीस कर्मचारी किंवा महिला रेल्वे कर्मचारी नियुक्त केल्याची माहिती कंसल यांनी दिली.तर वाचणार ४०० किलोमीटरनैनपूर ते जबलपूर ब्रॉडगेज लाईनचे काम पूर्ण करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. १ नोव्हेंबरपासून या मार्गावर ट्रेन बंद ठेवून ब्रॉडगेडचे काम सुरू केले जाणार आहे. बालाघाट ते नैनपूरपर्यंत झुडूपी जंगलाची जी समस्या होती, त्यातील पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. रेल्वेने बालाघाट ते गोंदियादरम्यान विद्युतीकरणाच्या कामालासुद्धा हिरवी झेंडी दाखविली आहे. २०१९ पर्यंत नैनपूर-जबलपूर ब्रॉडगेज तयार होऊन २०२० पर्यंत बालाघाट-गोंदिया विद्युतीकरणाचे कार्य पूर्ण होईल. यामुळे जबलपूर ते बल्लारशा ही उत्तर-दक्षिक स्थानके गोंदियामार्गे ब्रॉडगेज लाईनने जोडली जाऊन सध्या पडत असलेले जास्तीचे जवळपास ४०० किलोमीटरचे अंतर वाचणार आहे.रेल्वे गाड्यांत गांजा तस्करीदक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी रेल्वे गाड्यांमधून गांजाची तस्करी होत असल्याची बाब मान्य केली. ओरिसा ते गुजरातपर्यंत रेल्वे गाड्यांच्या माध्यमातून गांजा तस्करी केली जाते. गोंदिया-भंडारा जिल्ह्यातच अशा प्रकारची तस्करी तीनदा पकडण्यात आली आहे. गांजा तस्कर त्यासाठी आता शौचालयांचा उपयोग करतात. शौचालयातून पाणी रिक्त करून जेथे शौचास बसण्याची व्यवस्था असते, तिथे नट-बोल्ट उघडून गांजा छपविला जातो. याबाबत काही माहिती मिळाली तर ती रेल्वे अधिकाऱ्यांना द्यावी. माहिती देणाऱ्यांची नावे गुप्त ठेवण्यात येतील व त्यांना पुरस्कृतही केले जाईल, असे आवाहन कंसल यांनी केले.