शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसचे रास्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 22:57 IST

तिरोडा ते तुमसर राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे मागील अनेक महिन्यांपासून सुरू आहे. हे काम संथ गतीने सुरू असल्याने तालुक्यातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम जलद गतीने पूर्ण करण्यात यावे.

ठळक मुद्देरस्त्याचे काम त्वरित करा : तहसीलदारांना दिले विविध मागण्याचे निवेदन,

लोकमत न्यूज नेटवर्कइंदोरा : तिरोडा ते तुमसर राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे मागील अनेक महिन्यांपासून सुरू आहे. हे काम संथ गतीने सुरू असल्याने तालुक्यातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम जलद गतीने पूर्ण करण्यात यावे. या मागणीला घेवून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शुक्रवारी (दि.१२) दुपारी १२ वाजता बिरसी फाटा येथे माजी आ.दिलीप बन्सोड, राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन यांच्या नेतृत्त्वात रास्ता रोका आंदोलन करण्यात आले.तिरोडा ते तुमसर राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागातर्फे कंत्राटदाराच्या माध्यमातून करण्यात येत आहे. मात्र कंत्राटदाराकडून रस्त्याचे काम फार संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना लांब अंतरावरुन जावे लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम जलद गतीने पूर्ण करण्यात यावे, यासाठी हे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तालुक्यातील रस्ते खराब असल्यामुळे बस सेवा बंद करण्यात आली आहे. परिणामी शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.त्यामुळे बंद केलेली बस सेवा त्वरीत पूर्ववत करण्यात यावी. शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून खरीप व रब्बी धानाचे सरसकट बोनस देण्यात यावे,शेतकऱ्यांना शेतीकरिता कृषी पंपासाठी वीज पुरवठा करण्यात यावा, प्रलंबित विद्युत जोडण्या देण्यात याव्या, तसेच शेतकऱ्यांना शेतीकरिता सोलर पंपाची अट रद्द करण्यात यावी. आदी मागण्यां सुध्दा आंदोलकांनी यावेळी लावून धरल्या.या वेळी विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने तहसीलदार, तिरोडा आगार प्रमुख यांना निवेदन देण्यात आले. तहसीलदारांनी समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.या वेळी माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी, राजलक्ष्मी तुरकर, तालुकाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले, सभापती निता रहांगडाले, कैलास पटले, किशोर पारधी, मनोहर राऊत, वाय.टी. कटरे, सुनिता मडावी, उषा किंदरले, जया धावडे, प्रदीप मेश्राम, माया शरणागत, संध्या गजभिये, माया भगत,बबलदास रामटेके, रामकुमार असाटी, सुखराम उके, देवेंद्र मंडपे, नरेश जुनेवार व राष्टÑवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस