शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांंसाठी राष्ट्रीय महामार्ग ठरताहे कर्दनकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 22:02 IST

नागपूर-रायपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगतच नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान व नागझिरा अभयारण्याची सीमा लागू आहे. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वन्यप्राण्यांची वर्दळ असते.

ठळक मुद्देस्पीडब्रेकर लावण्याची मागणी : अपघाताच्या संख्येत वाढ

राजेश मुनिश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : नागपूर-रायपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगतच नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान व नागझिरा अभयारण्याची सीमा लागू आहे. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वन्यप्राण्यांची वर्दळ असते. या मार्गावर स्पीड ब्रेकरचा अभाव आणि महामार्गालगत ताराच्या कुंपनाचा अभाव असल्याने वाहनाच्या धडकेत वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग वन्यप्राण्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे.मागील वर्षभरात या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर दोन बिबट, एक रानगवा, एक अस्वल व एक तडस प्राण्यांचा अपघातात बळी गेला. त्यानंतर शुक्रवारी(दि.१४) सायंकाळच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट्या जागीच ठार झाल्याची घटना घडली. या मार्गावरील अपघातांच्या संख्येत वाढ होत असल्याने वन्यप्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल आहे.डुग्गीपार ते देवपायली व बाम्हणी खडकी ते पुतळी फाटा- मासुलकसा या बफर झोन परिसराच्या पाच कि.मी.अंतरात वन्यप्राण्यांच्या अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रस्त्यावरचे गाव परिसरातील काहीजण रात्रभरात त्या प्राण्यांचे अवशेषच गायब करीत असल्याची चर्चा आहे. यासाठी वन्यजीव विभाग व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीची गस्त वाढविण्याची गरज आहे. व्याघ्र प्रकल्प व बफरझोन परिसरातील महामार्गावर (गतीरोधक) स्पीड ब्रेकर ठिकठिकाणी तयार करण्याची गरज आहे. कोहमारा गावापासून मुरदोलीपर्यंत विविध वन्य प्राण्यांचे फोटो लावून जनजागृती केली पाहिजे. प्राण्यांचे फोटो लावल्याने वाहन चालकही आपल्या वाहनाच्या वेग नियंत्रीत ठेवतील. त्यामुळे अपघाताच्या घटनांवर आळा घालणे शक्य होईल. मात्र वन्यजीव व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अद्यापही याची दखल घेतली नाही. नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील काळीमाती, कवलेवाडा व झनकारगोंदी या तीन गावांचा पुनर्वसन झाल्याने आता व्याघ्र प्रकल्पात वन्यप्राण्यांची संख्या बऱ्यापैकी वाढली आहे. दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील वन्यप्राण्यांचे वाढते अपघात रोखण्यासाठी वन्यजीव विभागाने वेळीच पाऊले उचलण्याची गरज आहे.

टॅग्स :leopardबिबट्याAccidentअपघात