गोंदिया : गोंदिया शिक्षण संस्थेव्दारे संचालित धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयात विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांच्या विद्यमाने रसायनशास्त्र विभागातर्फे एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राचा समारोप रसायनशास्त्राच्या सुक्ष्ममापन पध्दतीवरील चर्चेने झाला. मंचावर चर्चासत्राचे समन्वयक प्राचार्य डॉ.अंजन नायडू, तर प्रमुख अतिथी रेल्वे सुधार प्रन्यास बेंगलोरचे एस.एस. गॅगरीन, श्री सत्यसाई युनिवर्सीटी आॅफ टेक्नोलॉजी अॅन्ड मेडिकल सायन्स (सिहोर)चे उपकुलगुरू डॉ.नविन चंद्रा, रातुम नागपूर विद्यापीठाचे माजी विभाग प्रमुख डॉ.एस.व्ही. मोहरील व गणित विभाग प्रमुख डॉ.एच.आर. त्रिवेदी, इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख डॉ. जे.जी. महाखोडे व संयोजन सचिव डॉ.रवि किशोर हातझाडे उपस्थित होते. प्राचार्य डॉ.नायडू यांनी आपल्या प्रास्ताविकात चर्चासत्राची उपलब्धता व महत्व सांगून महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना व उपस्थित संशोधन प्रतिनिधींना या विषयांच्या मार्गदर्शनाच्या लाभ घेण्याचे आवाहन केले. चर्चासत्राच्या विभिन्न सत्रामध्ये प्रा.डॉ.बी.एन. बेरड, रातुम नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाचे प्रा. डॉ.एल.जे.पालीवाल, मोहता विज्ञान महाविद्यालय, नागपूर प्रा.डॉ.एम.जी. धोंडे, व आॅर्टस, कामर्स व सायन्स महाविद्यालय, कोराडीचे प्रा. डॉ. सी.एस. भास्कर उपस्थित होते. याप्रसंगी विविध चर्चासत्रांचे अध्यक्षस्थानी एस.एन.मोर महाविद्यालय तुमसरचे प्राचार्य डॉ.सी.बी.मसराम, बोर्ड आॅफ स्टडीज कॅमेस्ट्रीचे अध्यक्ष डॉ.पी.के. रहांगडाले, बोर्ड आॅफ स्टडीज गृह विज्ञान रातुम नागपूर विद्यापीठ नागपूरचे अध्यक्ष डॉ.आर.वी.लांजेवार, डॉ.एम.आर. पटले उपस्थित होते. चर्चासत्राला प्राध्यापक,विद्यार्थी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
राष्ट्रीय चर्चासत्राची सांगता
By admin | Updated: December 25, 2014 23:35 IST