शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नायब तहसीलदारांचे दोन तास धरणे आंदोलन, २८ डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन

By नरेश रहिले | Updated: December 18, 2023 18:57 IST

मागण्या मंजूर न झाल्यास २८ डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला.

गोंदिया: नायब तहसीलदारांना राजपत्रीत वर्ग-२ यांचे ग्रेड पे ४८०० रूपये करण्यात यावे या मागणीला घेऊन गोंदियाच्या नायब तहसीलदारांनी १८ डिसेंबर रोजी तब्बल दोन तास धरणे आंदोलन केले आहे. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी स्मीता बेलपत्रे यांच्याकडे मुख्यमंत्री, महसूल मंत्री व अप्पर मुख्य सचिव यांच्या नावे निवेदन देण्यात आले. मागण्या मंजूर न झाल्यास २८ डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला.महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेने नायब तहसिलदार राजपत्रित वर्ग २ यांचे ग्रेड पे ४८०० रूपये करण्यासाठी के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखालील त्रुटी समिती (बक्षी समिती) समोर सादरीकरणावर तत्काळ कार्यवाही करण्यात यावी, या मागणीला घेऊन ५ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेने एक दिवशीय रजा आंदोलन व विभागीय आयुक्त कार्यालय येथे धरणे आंदोलन केले होते. परंतु शासनाने दखल घेतलेली नाही. त्यामुळे १८ डिडसेंबर रोजी दोन तास धरणे आंदोलन केले आहे. आंदोलनात नायब तहसीलदार के.के. अदाने, विशा सोनवाने, पी.बी. तिवारी, सी.एन. बाबडे, एन.एस. चवरे, सीमा पारणे, आप्पासाहेब वनकडे, एन.ए. विटले, शरद हलमारे, अश्वीनी नंदेश्वर, संजय धार्मीक यांचा समावेश होता.

टॅग्स :agitationआंदोलनgondiya-acगोंदिया