शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

बर्लिनच्या नावाखाली आंध्रप्रदेशात गेले पैसे, जर्मनीत घर शोधणाऱ्या विद्यार्थिनीची फसवणूक

By योगेश पांडे | Updated: April 11, 2023 17:42 IST

अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंद

नागपूर : जर्मनीत शिक्षणासाठी जाणाऱ्या एका विद्यार्थिनीला ऑनलाईन घर शोधणे महागात पडले. तिची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. बर्लिन येथील एंजेला गेल नामक महिलेच्या नावाखाली तिच्याशी आरोपीने संवाद साधला व प्रत्यक्षात तिने पाठविलेले पैसे आंध्रप्रदेशातील भरत गांधी नामक व्यक्तीच्या बॅंक खात्यात जमा झाली. कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

कोराडी मार्ग परिसरात राहणाऱ्या २४ वर्षीय विद्यार्थिनीचा जर्मनीतील बर्लिन येथील विद्यापीठात प्रवेश झाला आहे. ती लवकरच शिक्षणासाठी तेथे जाणार असून ती तेथे राहण्यासाठी भाड्याचे घर शोधत होती. यासाठी तिने तेथील एका संकेतस्थळावर स्वतःची पूर्ण माहितीदेखील दिली. तिला काही दिवसांनी एंजेला गेल नामक महिलेच्या नावानी ई-मेल आला. त्यात एंजेलाने तिचे घर भाड्याने द्यायचे आहे, असे सांगितले व महिन्याचे भाडे ५० हजार असेल असे सांगितले. त्यांच्यात चॅटिंगदेखील झाले.

३१ जानेवारी रोजी विद्यार्थिनीने तिला जवळपास ५० हजार रुपये मोबाईलवर ऑनलाईन पाठविले. त्यानंतर तिने एंजेलाला व्हिडीओ कॉल करण्यास सांगितले. मात्र मी सध्या कार्यालयात असून येथे संगणकाला कॅमेरा नाही असे कारण एंजेलाने दिले. यावरून विद्यार्थिनीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली व तिने पैसे जेथे पाठविले त्या खात्याची माहिती काढली. संबंधित खाते आंध्रप्रदेश येथील पद्मावती नगर येथील भरत गांधी नामक व्यक्तीचे असल्याचे तिला कळाले. आपली फसवणूक झाल्याचे कळताच तिने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. हे प्रकरण कोराडी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले असून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीnagpurनागपूर