शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शन योजनेसह अन्य मागण्यांसाठी नगर परिषद - पंचायत कर्मचारी गेले संपावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 16:21 IST

गेट मिटींग घेऊन केले निदर्शन : सर्वत्र कामकाज झाले ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जुनी पेन्शन योजना लागू करणे यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेने गुरुवारपासून (दि. २९) काम बंद आंदोलनाला सुरूवात केली आहे. परिणामी जिल्ह्यातील तीन नगर परिषदा व पाच नगर पंचायतींमधील संवर्ग अधिकारी- कर्मचारीही यात सहभागी झाले असून, त्यांचे कामकाज बंद पडले आहे. सर्वच ठिकाणी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गेट मिटींग घेऊन मागण्यांसाठी निदर्शने केली व कामकाज बंद केले.

महाराष्ट्र शासनांतर्गत नगर परिषदा, नगर पंचायतींमधील सन २००५ नंतरच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना अद्याप राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आलेली नाही. तसेच जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही कारणास्तव राज्य संवर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांतून कमालीचा रोष व्यक्त होत आहे. यामुळे जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, यासाठी संघटनेचे सदस्यही आग्रही आहेत. तसेच संघटनेमार्फत शासन, नगरविकास विभाग व नगर परिषद प्रशासन संचालनालयाला वेळोवेळी निवेदन सादर करण्यात आले आहे. मात्र, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मूलभूत समस्या व मागण्यांकडे शासनाकडून दुर्लक्ष होत आहे.

ही बाब लक्षात घेत संघटनेकडून १४ ऑगस्ट रोजी विशेष सभा घेण्यात आली असता, त्यात जुनी पेन्शन योजना लागू करणे व संघटनेच्या समस्या व मागण्यांना घेऊन गुरुवारपासून (दि. २९) राज्यव्यापी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेने गुरूवारपासून (दि. २९) संप पुकारला आहे. 

संपाच्या पहिल्या दिवशी गुरुवारी (दि. २९) येथील नगर परिषद कार्यालयात संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन गाडकिने यांच्या नेतृत्वात गेट मिटींग घेण्यात आली. तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी निदर्शने करून कामकाज बंद केले. याशिवाय, जिल्ह्यातील अन्य नगर परिषदा व नगर पंचायतींमध्येही गेट मिटींग घेऊन त्यानंतर कामकाज बंद करण्यात आले. 

सुमारे ४५० अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेने घेतला आहे. यामुळे या संपात जिल्ह्यातील तीन नगर परिषदा तसेच पाच नगर पंचायतींमधील संवर्ग अधिकारी, कर्मचारीही सहभागी झाले आहेत. जिल्ह्यातील नगर परिषदा व पाच नगर पंचायतींमधील अधिकारी-कर्मचारी संपावर गेले आहेत.

स्वच्छता कर्मचारी आज समर्थन देणार या बेमुदत संपात नगर परिषदा व नगर पंचायतींमधील संवर्ग अधिकारी - कर्मचारी सहभागी असून, त्यात स्वच्छता, वीज, पाणीपुरवठा तसेच प्रशासनिक विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आता हे अधिकारी- कर्मचारी संपावर जाणार असल्यामुळे त्यांच्या विभागांचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, या संपात स्वच्छता कर्मचारीही शुक्रवारपासून सहभागी होणार आहेत, असे स्वच्छता कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तिलक दीप यांनी कळविल्याची माहिती आहे. यानंतर मात्र संपाचा फटका शहरवासीयांनाही बसणार, यात शंका नाही.

टॅग्स :gondiya-acगोंदिया