शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मायबाप सरकार तुम्हीच सांगा आम्ही नेमके कोणत्या प्रवर्गात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 05:00 IST

प्रत्येक प्रवर्गाला त्यांच्या  हिस्स्याचे जे जे काही आहे ते शासनातर्फे मिळते. पण सोनझारी समाजाचा कुठल्याच प्रवर्गात समावेश नसल्याने देशातील साऱ्या सोई-सुविधांपासून कोसो दूर आहेत. नाल्या नदीतील रेतीतून सोन  काढणे. मातीतून सोने काढणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय आणि म्हणून त्यांना सोनझारी हे नाव पडलं असावं. चाळणीसारख्या लोखंडाच्या धातूतून  सोनं काढण्यासाठी त्यांची भटकंती चाललेली असते.

अंकुश गुंडावारलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नदी, नाले, रेती आणि मातीतून सोने शोधून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या सोनझारी समाजबांधवांना स्वातंत्र्यांच्या ७५ वर्षांनंतरही शासकीय दस्तावेजात आपण कुठल्या प्रवर्गात हे शोधण्यात यश आले नाही. शासन आणि प्रशासनाच्या दप्तर दिंरगाईमुळे अजुनही या समाजाचा कुठल्याच प्रवर्गात समावेश झाला नसल्याने शासकीय योजनांपासून वंचित राहून उपेक्षितांचे जिणे जगावे लागत आहे. त्यामुळे हे समाजबांधव मायबाप सरकार तुम्हीच सांगा आम्ही कोणत्या प्रवर्गात असा सवाल शासनाला करीत आहे. प्रत्येक प्रवर्गाला त्यांच्या  हिस्स्याचे जे जे काही आहे ते शासनातर्फे मिळते. पण सोनझारी समाजाचा कुठल्याच प्रवर्गात समावेश नसल्याने देशातील साऱ्या सोई-सुविधांपासून कोसो दूर आहेत. नाल्या नदीतील रेतीतून सोन  काढणे. मातीतून सोने काढणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय आणि म्हणून त्यांना सोनझारी हे नाव पडलं असावं. चाळणीसारख्या लोखंडाच्या धातूतून  सोनं काढण्यासाठी त्यांची भटकंती चाललेली असते. पहांदी पारी कुपार लिंगो बहुउद्देशीय संस्थेने गोंदिया जिल्ह्यात केलेल्या सर्वेक्षणानुसार ९३२ या जिल्ह्यात आहेत. आता हे लोक शिक्षणाच्या प्रवाहात येऊन राहिलेले आहेत. दहावीच्यावर कुणीच शिकलेले नाहीत. सोन काढण्यासाठी या प्रांतातून त्या प्रांतात या देशातून त्या देशात भटकत असल्यामुळे कुटुंबासोबत  लहान मुलेही जातात. साहजिकच त्यांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होते.

सोन्यासारख्या जीवनाची होतेय माती- या समाजात जात-पंचायत असते. समाजाचे संपूर्ण निर्णय ही जातपंचायत घेत असते. एवढेच नाही तर सहसा आपल्या कुटुंबातील लोकांना रुग्णालयातसुद्धा ते घेऊन जात नाही. जात पंचायतीचा निर्णय मानला नाही तर सामाजिक बहिष्काराला त्या कुटुंबाला सामोरे जावे लागते. त्यांची आडनावे नेताम, सयाम, टेकाम अशी आहेत. संस्थेने केलेल्या सर्वेनुसार तत्कालीन एचडीओ यांनी एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट केले होते. अन् काही दिवसानंतर नोटीस देऊन त्यांच्याकडून प्रमाणपत्र मागवून घेण्यात आले. त्यांच्या समाजाचे संपूर्ण नियमसुद्धा अतिशय वेगळे आहेत. सोन्याच्या शोधात त्यांच्या सोन्यासारख्या जीवनाची माती होत आहे.

केवळ झरेका उल्लेख नसल्याने प्रवर्ग नाकारला- हा प्रश्न केवळ गोंदिया जिल्ह्याचाच नसून संपूर्ण भारतात सोनझारी समाजाला प्रवर्ग मिळाला नाही. अनुसूचित जमातीच्या असलेल्या जातीच्या अनुसूचीमध्ये १८ व्या क्रमांकावर सोनझारी झरेका त्यांचा उल्लेख राजगोंड म्हणून केलेला आहे. पण सोनझारी लिहिलेला आहे आणि झरेका लिहिलं नाही म्हणून त्यांना प्रवर्ग नाकारल्या गेला. सोन्याच्या शोधात सतत त्यांची भटकंती चालत असल्यामुळे शिक्षणाकडे पूर्णतः दुर्लक्ष त्यांचे होत आहे. त्या मुलांसाठी कायमस्वरूपी निवासी शाळा निर्माण झाल्या तर नक्कीच त्यांच्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाही.

पहांदी पारी कुपार लिंगो बहुउद्देशीय संस्थेने गोंदिया जिल्ह्यात केलेल्या सर्वेक्षणानुसार ९३२ या जिल्ह्यात आहेत. आता हे लोक शिक्षणाच्या प्रवाहात येऊन राहिलेले आहेत. मात्र शासनाने यांचा कुठल्याच प्रवर्गात समावेश न केल्याने त्यांना सोयी सुविधांपासून सोनझारी समाजबांधव वंचित आहे. - सविता बेदरकर, अध्यक्ष पहांदी पारी कुपार लिंगो बहुउद्देशीय संस्था

 

टॅग्स :reservationआरक्षण