माझी वसुंधरा अभियानांतर्गत ८ जानेवारी रोजी नगर परिषदेमार्फत विविध विषयांवर भिती चित्रिका स्पर्धा पार पडली. ११ जानेवारी रोजी शहरातील वायू गुणवत्ता वाढविण्यासाठी तसेच नागरिकांनी इंधन वाहनांचा वापर कमी करून सायकलचा वापर करण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी गांधी प्रतिमा येथून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. सायकल रॅली गांधी प्रतिमा ते पोलीस स्थानक ते गिरिजाबाई कन्याशाळा रोड ते खैरलांजी रोड ते प्रेमबंधन लाॅन ते नगर परिषद कार्यालयापर्यंत काढण्यात आली. शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कोरोना योध्दांचा सत्कार करण्यात आला. सायकल रॅली व सत्कार समारंभात नगर परिषद अध्यक्ष सोनाली देशपांडे, उपाध्यक्ष सुनील पालांदूरकर, मुख्य अधिकारी अर्चना मेंढे, बांधकाम सभापती जगदीश कटरे, नगर परिषद सदस्य प्रभू असाटी, राजेश गुणेरीया, राखी गुणेरीया, भावना चवळे, श्वेता मानकर, स्वास्थ्य अभियंता सतीश तांदूळकर उपस्थित होते.
माझी वसुंधरा उपक्रम ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:16 IST