शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

खोटे सोने विक्री करणाऱ्या तरूणाचा खून; दोघांवर प्राणघातक हल्ला

By नरेश रहिले | Updated: September 19, 2023 20:43 IST

डांगोर्ली येथील घटना: पाच जणांना अटक, आणखी आरोपी वाढण्याची शक्यता

गोंदिया: आम्हाला नकली सोना विक्री करून आमची फसवणूक करतो, असे म्हणत तीन तरूणांना बेदम मारहाण करण्यात आली. यात एका तरूणाचा खून करण्यात आला तर दोघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना १८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता डांगोर्ली येथे घडली. किशोर चुन्नीलाल राठौर (३० रा. गोंडीटोला, कटंगीकला ता. जि. गोंदिया) असे मृताचे नाव आहे. तर संदीप मदनलाल ठकरेले (२३) व देवदीप राजेंद्र जैतवार (१८) रा. हनुमान मंदीरचे मागे, गोंडीटोला, कटंगीकला अशी जखमींची नावे आहेत.

गोंदिया तालुक्याच्या गोंडीटोला कटंगीकला येथील संदीप ठकरेले, किशोर राठौर व देवदीप जैतवार हे तिघेही १८ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता मोटार सायकलने किशोर राठोड याच्याकडे असलेला नकली सोन्याचा झुमर विकण्याकरीता डांगोर्ली येथे गेले होते. आम्हाला नकली सोना विक्री करून आमची फसवणूक करता असे बोलून आरोपींनी त्या तिघांना मारपीट करुन जबरीने आपल्या मोटार सायकलवर बसवून मध्यप्रदेशच्या डोंगरगाव येथे नेले. देवदीप जैतवार याच्या जवळील ५ हजार रूपये बळजबरीने हिसकावून घेतले. काठीने बेदम मारहाण केल्यामुळे यात किशोर राठौर याचा मृत्यू झाला.

या घटनेसंदर्भात रावणवाडी पोलिसांनी आरोपींवर भादंविच्या कलम ३०२, ३६४, ३८६, ३४१, १४३, १४४, १४४, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील पाच आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व रावणवाडी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ताजने यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, रावणवाडीचे ठाणेदार पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सरवदे, अंबुरे, पोलीस हवालदार राजेंद्र मिश्रा, महेश मेहर, रियाज शेख, सुमेंद्र तुरकर तुलसीदास लुटे, इंद्रजीत बिसेन, लक्ष्मण बंजार, संतोष केदार, विनोद गौतम यांनी कामगिरी केली आहे.

वेगवेगळे पथके केली होती तयार

रावणवाडी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून आरोपींच्या शोधासाठी वेगवेगळी पथके तपासासाठी रवाना करण्यात आले होते. आरोपींना मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील वाराशिवनी येथे अटक करण्यात आली. 

यांना केली अटक; आरोपी वाढण्याची शक्यताया प्रकरणात ओमप्रकाश खिलेश्वर चौधरी (१८), अजय तुरकर (३५), शुभम उर्फ राजू दीपचंद ठाकरे (२३), अशोक ठाकरे (४०), आलोक बिसेन (२४) सर्व रा. कोसते, ता. वाराशिवनी, जिल्हा - बालाघाट (मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात आली. या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या गुन्ह्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

 

टॅग्स :gondiya-acगोंदियाCrime Newsगुन्हेगारी