लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असून शासकीय यंत्रणा संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कामाला लागली आहे. लॉकडाऊनचा ५ टप्पा सुरु झाला असून शासन व जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्यासाठी नगर परिषदेने पुढाकार घेतला आहे. विविध उपाययोजनांच्या माध्यमातून शहरात खबरदारी घेतली जात आहे. नगर परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी वेळोवेळी परिस्थितीचा आढवा घेवून नियंत्रण ठेवून आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व मार्गदर्शक सूचना सुचविण्यात आल्या आहेत. या माध्यमातून विषाणूला आळा घालण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार नगर परिषदेच्यावतीने शहरातील १७ वॉर्डामध्ये नियंत्रण अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.नगर परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी दिलेली जबाबदारी योग्यरित्या पार पडत आहेत.नगर परिषद आरोग्य विभागातर्फे शहरात परराज्य व जिल्ह्यातून येणाऱ्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांना विलगीकरणात ठेवले जात आहे. सफाई कामगारांकडून शहराच्या स्वच्छतेची काळजी घेतली जात असून शहरामध्ये अग्निशमन पथकाच्या माध्यमातून फवारणी करुन निर्जंतुकीकरण केले जात आहे. जनजागृती करणारे फलक प्रत्येक चौकात लावण्यात आले आहेत. शहरातील नागरिकांना सार्वजनिक स्थळी मास्क लावून प्रवेश करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुद्धा केली जात आहे.सर्व दुकानांसमोर फिजिकल डिस्टन्सिंग राखण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील सेवाभावी संस्था व व्यापारी निराधार व्यक्तींची नियमितपणे भोजनाची व्यवस्था करुन आपले योगदान देत आहेत.
कोरोनाला रोखण्यासाठी नगरपरिषदेचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:00 IST
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व मार्गदर्शक सूचना सुचविण्यात आल्या आहेत. या माध्यमातून विषाणूला आळा घालण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार नगर परिषदेच्यावतीने शहरातील १७ वॉर्डामध्ये नियंत्रण अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी नगरपरिषदेचा पुढाकार
ठळक मुद्देविविध उपाययोजनांच्या माध्यमातून खबरदारी