शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कामांना निधी मिळत नसल्याने खासदारांची नाराजी; सभागृहात खाली बसून व्यक्त केली नाराजी

By अंकुश गुंडावार | Updated: January 20, 2026 19:55 IST

सूचविलेल्या कामांना निधी मिळत नसल्याची तक्रार : पालकमंत्र्यांकडून मनधरणी

गोंदिया : विरोधी पक्षातील खासदारांनी सुचविलेल्या कामासाठी वांरवार मागणी करुन सुध्दा निधी मिळत नाही, जर निधीच मिळत नसेल तर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहयचे तरी कशाला अशी नाराजी व्यक्त करीत भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा. डॉ. प्रशांत पडोळे यांनी मंगळवारी (दि.२०) जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित बैठकीत चक्क सभागृहात खाली बसले. या प्रकाराने सभागृहात गोंधळ उडाला होता. अखेर पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी निधी देण्याचा शब्द दिल्यानंतर खा.पडोळे मंचावर येऊन बसले.

जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्या उपस्थितीत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर, खा.डॉ. प्रशांत पडोळे, आ.डॉ. परिणय फुके, ॲड. अभिजीत वंजारी, विनोद अग्रवाल, राजकुमार बडोले, संजय पुराम, जिल्हा परिषदेचे सदस्य, जिल्हाधिकारी प्रजित नायर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानथम, पोलीस अधीक्षक गोरख भामरे, नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्प उपसंचालक प्रीतमसिंग कोडापे, उपवनसंरक्षक पवनकुमार जोंग, नियोजन उपायुक्त अनिल गोतमारे, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीधर वाडेकर व सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. 

बैठकीला सुरुवात झाल्यानंतर मंचावर बसलेेले खा.डॉ. प्रशांत पडोळे यांनी मी सुचविलेल्या कामांना निधी मिळत नाही. आमच्या कामांना निधी मिळणार नसेल तर आम्ही सभागृहात उपस्थित तरी कशाला राहयचे, आम्ही सूचविलेल्या कामाला निधी मिळणार की असा सवाल पालकमंत्री इंद्रनील नाईक यांना केला. मात्र त्यांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ते नियोजन समितीच्या बैठकीच्या मंचावरून सभागृहात खाली गेले व जमिनीवर बसले. यानंतर पालकमंत्र्यांनी त्यांना निधी देऊ असा शब्द दिल्यानंतर ते पुन्हा बैठकीच्या मंचावर जाऊन बसले. खा. पडोळे यांच्या या कृतीमुळे नियोजन समितीच्या सभागृहात काही वेळ गोंधळ उडालेला होता. 

English
हिंदी सारांश
Web Title : MP Protests Fund Allocation, Sits on Floor; Minister Assures Funds

Web Summary : MP Dr. Padole protested lack of funds for his projects, sitting on the floor during a planning meeting. Minister Naik pledged funds, ending the disruption.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र