शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

खासदार दत्तक गावातील डिजिटल शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 22:52 IST

झेडपीच्या प्राथमिक शाळा म्हणजे उपहास आणि उपेक्षेच्या धनी. नशीबी कायम चणचण, ओसाड आणि सगळ्यांची दूषणे.

ठळक मुद्देउपक्रमांचा बोलबाला : एका अबोल क्रांतीची डिजिटल कहाणीअध्यक्ष करतात स्वयंपाकीचे काम

दिलीप चव्हाण।ऑनलाईन लोकमतगोरेगाव : झेडपीच्या प्राथमिक शाळा म्हणजे उपहास आणि उपेक्षेच्या धनी. नशीबी कायम चणचण, ओसाड आणि सगळ्यांची दूषणे. या सर्व बाबींना बाजूला सारत खासदार दत्तक ग्राम भुताईटोलाच्या झेडपी शाळेने डिजिटल शाळा तयार केली. येथील दोन शिक्षकांनी आपल्या शाळेचा सरकारी नक्षाच बदलून टाकला आहे.भुताई टोला (पाथरी) जिल्हा परिषद डिजिटल प्राथमिक शाळा सन २०१५ मध्ये डिजिटल झाली. पाच वर्षांपासून १०० टक्के प्रगत शाळा, सुसज्ज शालेय परिसर व सोबतच २०० मोठी झाडे, मूल्यवर्धन उपक्रम, ज्ञान रचनावादी शाळा या बाबी शाळेच्या जमेच्या बाजू आहेत.शाळा डिजिटल करण्यासाठी लोकवर्गणीच्या माध्यमातून एक लाख ३५ हजार लोकवर्गणी झाली आणि लोकसहभागातून वीज बिल भरले जाते.येथे श्रमदानातून वाचन कुटी तयार करण्यात आली. वाचनकुटीच्या भोवताली तारेवर विविध प्रकारच्या पुस्तका, शालेय परिसरातील विविध झाडांवर विद्यार्थ्यांनी आपल्या नावे लावलेले फलक या बाबी सरकारी शाळेसाठी नवल वाटणाऱ्या आहेत.शिक्षण हक्क कायद्यामुळे भुताईटोला शाळेत बरेच बदल झाले. शालेय व्यवस्थापन समित्यांनी गणवेश बदलले. टाय, बुट व आयकार्ड अशा कडक पोशाखात झेडपी शाळांतील मुलेही भलतीच रुबाबदार दिसतात. हा बदल भुताईटोला वासीयांना सुखावणारा होता. संगणक आल्यानंतर शाळेचे रूपच बदलले.गरजेइतके फर्निचर या शाळेत आहे. संगणक-प्रोजेक्टरच्या माध्यमातून माहिती तंत्रज्ञानाचा वापर व लोकसहभाग नावाच्या गोष्टीने येथील गावकरी शाळेशी जुळलेले आहे. गावकºयांच्या श्रमदानातून झाडांना पाणी देणे, वाचन कुटीची डागडुजी करणे आदी सर्व कामे भुताईटोलावासी स्वयंप्रेरणेने करतात.यातून भुताईटोला येथील जिल्हा परिषद डिजिटल शाळेचा नावलौकिक वाढत गेला. गावातल्या झेडपीच्या शाळेतील विविधांगी उपक्रमांचा बोलबाला होऊ लागला तशी पालकांनी कॉन्व्हेंटमधून मुले काढली आणि पुन्हा गावातल्या जिल्हा परिषद शाळेत घातली. भुताईटोला शाळेत यावर्षी १६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेत नवा इतिहास रचला. येथील दुसरी, तिसरी व चौथीची मुुले संगणक हाताळतात. दुसरीचे विद्यार्थी गुणाकार, वजाबाकी करून इंग्रजी वाचतात. येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने २०१५-१६ मध्ये असलेली विद्यार्थी संख्या दुप्पट झाली आहे. आजघडीला या शाळेत २९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.या शाळेचे मुख्याध्यापक माणिक शामलाल शरणागत, सहायक शिक्षक मुकेश अंबादे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सविता रहांगडाले, देविलाल पटले, कुवरलाल भोयर यांच्या देखरेखीत शाळेचा कारभार चालतो.या शाळेच्या पटसंख्या वाढीसाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मुख्याध्यापक शरणागत यांचा गौरव केला आहे. तर प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमात जिल्ह्यातून द्वितीय क्रमांकाचा मान या शाळेला मिळाला आहे.भुताईटोला (पाथरी) खासदार दत्तक ग्राम योजनेत समाविष्ट आहे. प्रफुल्ल पटेलांच्या प्रेमापोटी या गावाचा व शाळेचा विकास झाला आहे. आमच्या गावातील विद्यार्थी शिक्षणात पुढे कसे जातील, त्या दिशेने प्रयत्न सुरु आहेत.केवलराम बघेले,सदस्य, पंचायत समिती, पाथरी.विद्यार्थ्यांसाठी प्रोजेक्टर आणि संगणकाचा उत्तम वापर सुरू आहे. गुणवत्ता हिच आमची मालमत्ता, यासाठी आम्ही मेहनत करतो. पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने नवनव्या प्रयोगातून प्रगत शाळेकडे आमची वाटचाल सुरू आहे.माणिक शरणागत,मुख्याध्यापक, जि.प. शाळा, भुताईटोलाअध्यक्ष करतात स्वयंपाकीचे कामभुताईटोला येथील जि.प. शाळेत शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष डिलेश्वरी प्रितमलाल कटरे बीए,डीएड उच्चशिक्षित असतानाही सेवाभावी वृत्तीतून शाळेत स्वयंपाक करतात. कटरे यांनी स्वयंस्फुर्तीने विनामानधन तीन वर्षांपासून अध्यापनाचे काम हाती घेतले आहे. सकाळी स्वयंपाक करणे व नंतर मुलांना शिकविणे, असा डिलेश्वरी कटरे यांचा नित्यक्रम आहे. शाळेच्या स्वयंपाकासाठी हजार रुपयांत परवडत नाही म्हणून तीन वर्षांपूर्वी एका महिलेने शाळेतील काम सोडले. शासकीय धोरणाला खिळ बसू नये म्हणून डिलेश्वरी कटरे यांनी स्वयंपाक करण्याचे काम हाती घेतले. उच्चशिक्षित असून कोणतेही काम लहानमोठे होत नाही. या भावनेतून स्वत:च्या आत्मीक समाधानासाठी व मुलांच्या प्रगतीसाठी शाळेत काम करीत असल्याचे कटरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :Schoolशाळा