शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक संघाच्या धरणे आंदोलनामुळे समस्या मार्गी

By admin | Updated: July 27, 2014 23:49 IST

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका गोंदियाच्या वतीने पं.स. कार्यालय गोंदियासमोर तालुकाध्यक्ष अनिरूध्द मेश्राम यांच्या नेतृत्वात प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्यांना घेऊने धरणे

गोंदिया : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका गोंदियाच्या वतीने पं.स. कार्यालय गोंदियासमोर तालुकाध्यक्ष अनिरूध्द मेश्राम यांच्या नेतृत्वात प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्यांना घेऊने धरणे आंदोलन करण्यात आले. त्यामुळे शिक्षकांच्या अनेक समस्या मार्गी लागल्या.शिक्षक संघाचे आनंद पुंजे, नूतन बांगरे, वीरेंद्र कटरे, डी.टी. कावळे यांच्या मार्गदर्शनात धरणे आंदोलन करण्यात आले. शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन उपसभापती चमनलाल बिसेन, खंडविकास अधिकारी एस.के. वालकर, गटशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी यांना देण्यात आले. १२ शिक्षकांचे एप्रिल, मे, जून २०१४ चे वेतन ३० जुलैपर्यंत बँक खात्यामध्ये जमा होणार, सर्व शिक्षकांचे जून २०१४ चे वेतन सुध्दा लवकरात देण्यात येतील, एमएससीआयटी प्रमाणपत्राकरिता शिक्षकांची वेतनवाढ जुलै २०१४ मध्ये थांबविण्यात येणार नाही. पात्र शिक्षकांनी एमएससीआयटी प्रमाणपत्र परीक्षा सहा महिन्याच्या आत पूर्ण करावी, केंद्र प्रमुखाचे वेतन एप्रिल, मे २०१४ चे वेतन बँकेत जमा झाले, शालार्थ आॅनलाईन वेतन बीआरसीमध्ये संगणक आॅपरेटरव्दारे प्रत्येकी दोन-दोन केंद्राचे करण्यात येतील, शालेय पोषण आहाराचे थकीत बिल मुख्याध्यापक व स्वयंपाकी बाईचे सप्टेंबर २०१३ ते एप्रिल २०१४ पर्यंत देना बँक शाखा गोंदिया येथे पाठविण्यात आले. जि.प. गोंदियाकडून शालेय गणवेशाची राशी आल्यास मुख्याध्यापकांच्या खात्यात लवकरात लवकर जमा करण्यात येईल, शिक्षकांचे रजा प्रकरणे त्वरित काढण्यात येतील, शिक्षण सेवकांचे सहाव्या वेतन आयोगाचे १ ते ४ हफ्ते त्वरित पाठविण्यात आले. धरणे आंदोलनाला यशस्वी करण्याकरिता तालुकाध्यक्ष अनिरूध्द मेश्राम, सरचिटणीस गणेश चुटे, एस.यु. वंजारी, केदार गोटेफोडे, नागसेन भालेराव, नान बिसन, यशोधरा सोनवाने, अजय चौरे, एम.आर. बोपचे, अयुब खान, चंद्रशेखर दमाहे, विनोद सुर्यवंशी, यु.एन. उपवंशी, हेमंत पटले, लिकेश हिरापुरे, नरेंद्र जे. कटरे, सी.एस. सुर्यवंशी, किशोर शहारे, कृष्णा कापसे, वाय.डी. पटले, विनोद लिचडे, मोरेश बडवाई, रेणुका जोशी, एस.पी. कुंभलकर, दिलीप हरिणखेडे, रेखा ठाकरे, नंदकिशोर चित्रीव, आनंद मेश्राम, श्रीधर पंचभाई, दुर्गेश रहांगडाले, डी.डी. भगत, जे.एच. गेडाम, शैलेश गौतम, आर.डी. पारधी, वा.बी. चावके, नरेंद्र ठाकूर, शिवचंद शरणागत, कैलास डुमरे, एम.एस. नांदगाये, आर.एन. घारपिंडे, राजेश निंबार्ते, मयुर राठौड, एस.एम. बिसेन, एम.जी. हटिले, डी.एस. कोल्हे, सी.एस. कोसरकर, लखन लिल्हारे, करुणा मानकर व इतर शिक्षकांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)