शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

जिल्हा परिषदेत रिक्त पदांचा डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 06:00 IST

गोंदिया जि.प.ला रिक्त पदांचे ग्रहण लागलेले आहे. या जि.प.मध्ये गट अ ची ६९ पदे रिक्त आहेत. तर गट ब ची ३३ पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह ज्या पशुधनावर होतो ते पशुधन विभागाचे २० डॉक्टरच नाहीत. तशीच अवस्था आरोग्य विभागाची आहे.

ठळक मुद्देबेरोजगारांची दिशाभूल : विकासात्मक कामांवर परिणाम,गंगाधर परशुरामकर यांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य शासनाने काही दिवसांपुर्वी आम्ही तातडीने राज्यात ७२ हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती करु अशी घोषणा केली. यामुळे राज्यभरातील बेरोजगारांना दिलासा मिळाला. यासाठी सरकारी यंत्रणानी रिक्त जागाची माहिती संकलित करुन शासनाला सादर केली. यात गोंदिया जि.प.मधील विविध संवर्गातील ४२५ जागांची रिक्त माहिती दिली. मात्र मेगाभरतील या ४२५ गावांचा समावेश नाही. त्यामुळे ही महाभरती केवळ बेरोजगारांसाठी दिवास्वप्न ठरत आहे.गोंदिया जि.प.ला रिक्त पदांचे ग्रहण लागलेले आहे. या जि.प.मध्ये गट अ ची ६९ पदे रिक्त आहेत. तर गट ब ची ३३ पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह ज्या पशुधनावर होतो ते पशुधन विभागाचे २० डॉक्टरच नाहीत. तशीच अवस्था आरोग्य विभागाची आहे. या जागा ३१ आॅगस्टपर्यंत भरण्याची ग्वाही सरकारने दिली होती. जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी ८ ऑगस्ट रोजी झालेल्या स्थायी समिती सभेत गट अ आणि गट ब च्या रिक्त असलेल्या जागा कधी भरणार अशी विचारणा केली होती. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जुलैमधील एका सभेचा हवाला देऊन ३१ आॅगस्टपर्यंत भरण्यात येणार आहेत असे सांगितले. ३१ आॅगस्ट जाऊन सप्टेंबर संपत आहे. पण रिक्त पदे भरण्यात आली नाहीत. असाच प्रकार जि.प.च्या विविध संवर्गातील रिक्त पदाचे बाबतीत आहे. सरकारने गाजावाजा करुन राज्यात ७२ हजार पदांची मेगा भरती जाहिर केली. सुशिक्षीत बेरोजगारांनीही सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. पण तेही दिवा स्वप्नच ठरले. विविध शासकीय कार्यालयांनी दिवस रात्र एकत्र करुन रिक्त पदांची माहिती एकत्रीत करुन सरकारला पाठविली. प्राप्त माहितीनुसार एकट्या गोंदिया जिल्हा परिषदेत विविध संवर्गाची ४२५ पदे रिक्त असल्याची माहिती सरकारला सादर करण्यात आली. पण कारवाई शुन्य जि.प.चा कारभार गट अ रिक्त ६९ व गट ब रिक्त ३३ व इतर संवर्ग ४२५ अशी पदे रिक्त आहे.यावरुन जि.प.चा कारभार कसा चालत असेल याची कल्पना न केलेली बरी.जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हटले जाते येथून जिल्ह्यातील विकास कामांचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात. मात्र गट अ,ब,क दर्जाच्या कर्मचाऱ्यांची जवळपास पाचशे पदे रिक्त आहेत.याचा जिल्ह्यातील विकास कामांवर परिणाम होत. मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असतांना शासन मेगा भरतीच्या नावावर बेरोजगारांची दिशाभूल आणि थट्टा करीत आहे.- गंगाधर परशुरामकरजि.प.सदस्य, गोंदिया.

टॅग्स :zpजिल्हा परिषद