शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

पंचायत समिती कार्यालयात सर्वाधिक कारवाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 22:37 IST

खर्च पाण्याच्या नावावर लाच मागीतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २०१८ मध्ये डिसेंबर अखेरपर्यंत २५ कारवाया केल्या असून लाचखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यात पंचायत समिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्देएसीबीची आकडेवारी : वर्षभरात २५ लाचखोरांना दणका

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : खर्च पाण्याच्या नावावर लाच मागीतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २०१८ मध्ये डिसेंबर अखेरपर्यंत २५ कारवाया केल्या असून लाचखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यात पंचायत समिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या विभागात सर्वाधीक लाचखोर असल्याचे असल्याचे चित्र आहे.काम करण्यासाठी टेबलाच्या खालून खर्चापाणी किंवा मिठाईच्या नावावर पैशांची मागणी करण्याचे प्रकार वाढतच चालले आहे. आजघडीला पैशांच्या या देवाण-घेवाणीची एक परंपराच रुढ झाली आहे. चपराश्यापासून ते अधिकाऱ्यांपर्यंत एवढेच काय लोकसेवकही आता पैशांची मागणी करू लागल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत.लाचखोरीच्या या प्रकारांवर आळा घालण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची स्थापना करण्यात आली आहे. हा विभाग अशा या लाचखोरांच्या मुसक्या आवळण्याचे काम करीत आहे. मात्र यानंतरही लाचखोरीच्या प्रकरणात घट झालेली नाही. लाचखोरीच्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी गोंदियात २००९ पासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय सुरू करण्यात आले.सुरूवातीचा सन २०१३ पर्यंतचा काळ विभागासाठी तेवढा अनुकूल ठरला नाही. मात्र सन २०१४ पासून विभागाने यशाची पायरी चढण्यास सुरूवात केली. सन २०१४ मध्ये विभागाने २७ कारवाया केल्या. सन २०१५ या वर्षांत सवाधिक ३९ कारवाया करण्यात आल्या. सन २०१६ मध्ये एसीबीने जिल्ह्यात २६ तर सन २०१७ मध्ये १७ कारवाया केल्या आहेत.ग्रामपंचायत व महसूल विभाग दुसऱ्या क्रमांकावरपंचायत समिती कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या वर्षात सर्वाधिक ६ कारवाया केल्या आहेत. यामुळे पंचायत समिती कार्यालयात सर्वाधिक लाचखोरीचे प्रकार घडले असल्याचे दिसते. ग्रामपंचायत व महसूल विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे.एसीबीचे ग्रामपंचायत व महसूल विभागात प्रत्येकी ३ कारवाया केल्या आहेत. त्यानंतर वन विभागात २, जिल्हा परिषद २, शिक्षण विभाग १, भूमि अभिलेख १, नगर परिषद १, आरोग्य विभाग २ व वीज विभागात २ अशा एकूण २५ कारवाया केल्या आहेत.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचार