तिरोडा : धुुलीवंदनाच्या दिवशी पोलीस उपनिरीक्षकाला पाईपने मारण्याचा आरोप असलेले भाजपचे नगर सेवक संतोष मोहने यांना अटकपूर्व जामीन मिळविण्यात यश आले. पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन मोहने विरूद्ध भादंवि कलम ३५३, ३३२ नुसार गुन्ह्याची नोंद तिरोडा पोलिसात केली आहे. त्यांना पकडण्यासाठी पोलीस गेले असता ते मिळू शकले नाही. १४ मार्चला जिल्हा न्यायाधिश एस.आर. त्रिवेदी यांच्या आदेशान्वये १५००० रुपयांच्या जातमुचलक्यावर दिनांक १७ मार्चपर्यंत अटक पूर्व जामिन देण्यात आला. मात्र त्यांना दररोज दुपारी २ ते ३ च्या दरम्यान पोलीस स्टेशन तिरोडा येथे हजर होणे अशी अटक घातली आहे. नगरसेवक संतोष मोहने यांना मिळालेल्या अटकपूर्व जामिनाची प्रत तिरोडा पोलिसांना १४ मार्चला सायंकाळी प्राप्त झाली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीसनिरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कांबळे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
नगरसेवक मोहने यांना मिळाला अटकपूर्व जामीन
By admin | Updated: March 16, 2017 00:20 IST