शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अधीक्षक अभियंत्याच्या दालनात आमदाराचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2021 05:00 IST

महावितरणने शेतकऱ्यांना चुकीचे वीजबिल पाठविले आहेत. शेतीसाठी विद्युत विभाग आठ तास वीजपुरवठा करतो आणि मोटार ही ३ एच. पी.च्या वर नसल्याने अंदाजे महिना सरासरी ८०० रुपयांच्या वर वीजबिल जाऊ शकत नाही. म्हणजे प्रति क्वार्टर दोन ते अडीच हजार रुपयांच्यावर शेतकरी बांधवांना बिल यायला नको. तरी सुद्धा सरासरी वीज बिल हे ६ ते ८ हजार रुपये पाठविले जात आहे. एकूण वीजबिल हे लाखांच्या घरात असून, शेतकऱ्यांनी जर बिल भरले नाही तर वीजपुरवठा खंडित केला जातो.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विद्युत विभागाकडून ऐन वेळी शेतीचा वीजपुरवठा खंडित केल्याबद्दल आमदार विनोद अग्रवाल यांच्याकडे तक्रार नोंदवली होती. याचीच दखल घेत त्यांनी शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याच्या मागणीला घेऊन रामनगर येथील महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्या दालनात शेतकऱ्यांसह गुरुवारी (दि.२५) ठिय्या आंदोलन केले. वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. महावितरणने शेतकऱ्यांना चुकीचे वीजबिल पाठविले आहेत. शेतीसाठी विद्युत विभाग आठ तास वीजपुरवठा करतो आणि मोटार ही ३ एच. पी.च्या वर नसल्याने अंदाजे महिना सरासरी ८०० रुपयांच्या वर वीजबिल जाऊ शकत नाही. म्हणजे प्रति क्वार्टर दोन ते अडीच हजार रुपयांच्यावर शेतकरी बांधवांना बिल यायला नको. तरी सुद्धा सरासरी वीज बिल हे ६ ते ८ हजार रुपये पाठविले जात आहे. एकूण वीजबिल हे लाखांच्या घरात असून, शेतकऱ्यांनी जर बिल भरले नाही तर वीजपुरवठा खंडित केला जातो. अव्वाच्या सव्वा बिले पाठविणे ही शेतकरी बांधवांची थट्टाच आहे. म्हणून जोपर्यंत शेतकऱ्यांचे वीजबिल दुरुस्त करून देणार नाही तसेच खंडित केलेली वीजजोडणी पूर्ववत करणार नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार, अशी भूमिका आमदार विनोद अग्रवाल व शेतकऱ्यांनी घेतली होती. यामुळे काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, अधीक्षक अभियंता यांनी ज्या ज्या शेतकऱ्यांना वाढीव बिले आली आहेत त्यांनी एक अर्जासह आपले बिल जोडून कार्यालयाकडे करावा. विद्युत विभागाने दिलेली वाढीव वीजबिले कमी करून देऊ. तसेच चार क्वार्टरचा नियम आहे. पण किमान २ क्वार्टरचे पैसे भरल्यास वीज जोडणी पूर्ववत करू, असे आश्वासन अधीक्षक अभियंत्यांनी आमदार विनोद अग्रवाल यांना दिले. त्यानंतर हे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. पण आश्वासनाची पूर्तत: न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

 

टॅग्स :agitationआंदोलनMLAआमदार