शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

ंसरपंचाने केला पदाचा दुरूपयोग

By admin | Updated: September 15, 2015 04:25 IST

ज्या उद्देशानुसार सभेचे आयोजन केले होते, त्यानुसार सभा न घेता दुसऱ्या विषयानुसार सभा घेण्यास सरपंचाने

परसवाडा : ज्या उद्देशानुसार सभेचे आयोजन केले होते, त्यानुसार सभा न घेता दुसऱ्या विषयानुसार सभा घेण्यास सरपंचाने ग्रामसेवकाला बाध्य केले. मात्र याचा विरोध केल्यावर सरपंचाने स्वत: जि.प. पदाधिकाऱ्यांना फोन करून पदाचा दुरूपयोग करीत ग्रामपंचायत कार्यालयालाच कुलूप ठोकल्याचा प्रकार तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गोंडमोहाळी येथे घडला.गोंडमोहाळी ग्रामपंचायत येथे पहिली ग्रामसभा शासन आदेशानुसार १५ आॅगस्ट रोजी पार पडली. त्यात विषय सूचीनुसार ठराव विषयावर चर्चा करण्यात आली व ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. २४ आॅगस्ट रोजी नवनिर्वाचित सरपंच पौर्णिमा वडगाये यांनी आपल्या अधिकार क्षेत्रातील विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. त्या विषयसूचीत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांची निवड व ग्रा.पं. समितीची निवड करण्याच्या उद्देशाने सभा बोलावली होती. पण विषयानुसार सभा न घेता दुसऱ्या विषयानुसार सभा घेण्यास सरपंच पौर्णिमा वडगाये यांनी ग्रामसेवक धुर्वे यांना बाध्य केले. सरपंच नवीन असल्याने ग्रामसेवकाने त्यांना कायद्याची जाणीवही करून दिली. परंतु सरपंच, सत्तेत असलेले पदाधिकारी व सभेत उपस्थित समर्थक यांनी मागील सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे यावर सुरूवात करण्यास सांगितले. पण १५ आॅगस्ट रोजी यावर चर्चा होवून ठराव मंजूरही झाले आहे व सदर विषय सध्या पटलावर नसल्यामुळे ते चुकीचे होते. मात्र सरपंच, सदस्य व काही नागरिकांनी सभेत ग्रामसेवकावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. सभेत अंगणवाडी सेवकिा व शिक्षकही उपस्थित होते. आपण कार्यालयाला कुलूप ठोकल्याचे व त्याचा फोटो वर्तमान पत्रात देण्यासाठी काढल्याचे सरपंचाने खंडविकास अधिकाऱ्यांना फोनद्वारे कळविले. आपण आपल्या पदाचा दुरूपयोग केला आहे. आपल्याला कुलूप लावता येत नाही, असे खंडविकास अधिकारी गिऱ्हेपुंजे यांनी दूरध्वनीद्वारे सांगितल्यावर व कायद्याची जाणीव करून दिल्यावर त्यांच्या सहकाऱ्यांनी कुलुपही उघडले. मात्र गावात वातावरण खूपच तापले होते. या प्रकरणाची तक्रार विरोधी पक्षनेते, अनुभवी व २५ वर्षांपासून ग्रामपंचायतमध्ये प्रतिनिधित्व करणारे जागेश्वर निमजे, गोविंद ठाकरे, छगन राणे व इतर नागरिकांनी केली. तसेच सरपंच, उपसरपंच व सदस्यांवर कलम ३९ अन्वये कारवाई करण्यात यावी, अशी लेखी तक्रार जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी व आयुक्तांना केली आहे. (वार्ताहर)ग्रामसेवकाने ठेवले प्रसंगावधान४प्रकरण चिरघडल्यावर सभेत मारहाण किंवा शासकीय कागदपत्रांची चोरी किंवा फाडाफूड होवू शकते याबाबत प्रसंगावधान व वेळेचे भान ठेवून ग्रामसेवक धुर्वे यांनी सर्व दस्तावेज आलमारीत ठेवले. मात्र सरपंच हे सभा अध्यक्ष असूनही त्यांनी गोंधळ घालणाऱ्यांवर वचक न ठेवता त्यांच्यावर कारवाई केली नाही. तसेच जि.प. पदाधिकाऱ्यांना फोन करून स्वत: त्यांच्या आदेशाचे पालन करून आपल्याच कार्यालयाला कुलूप ठोकले व सभेत येणाऱ्या गावातील नागरिकांचे अपमान केले.ग्रामसेवकाचे बदली आदेश४सदर प्रकरणाची चौकशी न करता खंडविकास अधिकारी दुबे यांनी २९ नागरिकांच्या स्वाक्षरींच्या तक्रार अर्जानुसार, ग्रामसेवकाचे बदली आदेश काढून त्यांना पंचायत समिती कार्यालयात ठेवले. चौकशी करून नियमानुसार त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक होते. पण पदाधिकाऱ्यांच्या दबावाखाली आदेश काढल्याचा आरोप निमजे यांनी केला आहे. तसेच खंडविकास अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी ग्रामसेवकाने केली आहे.