शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

महागाव धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:33 IST

तालुक्यातील महागाव सिरोली येथील आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्रावर सर्रास नियमांचे उल्लंघन करुन शेतकऱ्यांचे धान खरेदी केले जात असल्याची तक्रार खरेदी विक्री समितीचे माजी संचालक यशवंत परशुरामकर यांनी केली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा आरोप : साध्या वनजकाट्याने मोजमाप

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : तालुक्यातील महागाव सिरोली येथील आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्रावर सर्रास नियमांचे उल्लंघन करुन शेतकऱ्यांचे धान खरेदी केले जात असल्याची तक्रार खरेदी विक्री समितीचे माजी संचालक यशवंत परशुरामकर यांनी केली आहे.तालुक्यात खरीप हंगामाचे धानपीक निघाले. शासकीय हमी भावाने धान खरेदी करण्याचा तिढा कसाबसा सुटला आधारभूत हमी भावाने धान खरेदी सुरु झाली. मात्र नियोजनशून्य कार्यप्रणालीमुळे बारदाणा नसल्यामुळे अनेकदा खरेदी केंद्र बंद पडत आहेत. उसणवारी करुन दिवाळीचा सण साजरा करणाऱ्या शेतकºयांना धानविक्री करुन उसणवारीची परतफेड करावयाची आहे.मात्र बारदान्याच्या अभावामुळे खरेदी केंद्र बंद पडण्याच्या प्रक्रियेमुळे अडचणी येत आहेत. महागाव येथील धान खरेदी केंद्रावर चक्क साध्या वजन काट्याने मोजमाप केले जात आहे. इलेक्ट्रॉनिक वजन काट्याला वारंवार चार्र्जींग करावी लागते.या सबबीखाली चक्क शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचा आरोप परशुरामकर यांनी केला आहे. साध्या वजनकाट्याने बारदाण्याचे वजन व झुकते माप घेवून एक क्विंटल मागे साधारणत: २ ते ३ किलोची लूट केली जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. या हंगामाची जेव्हापासून खरेदी सुरु झाली अगदी तेव्हापासूनच साध्या वजनकाट्यावर मोजमाप सुरु आहे. खरीप हंगामाचे काही शेतकऱ्यांचे धान निघाले नसतानाही त्यांनी खरेदी केंद्रावर विक्रीसाठी रजिस्टरमध्ये नोंदणीकरुन ठेवली आहे.याची ज्या शेतकऱ्यांना जाणीव नाही ते शेतकरी धानपिक निघाल्यानंतर धान खरेदी केंद्रावर पोहचत आहेत. त्यामुळे खरेदी केंद्रावर धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची भल्ली मोठी वेटिंग लिस्ट तयार झाली आहे. यातच खरेदी विक्री संघ व ग्रेडरच्या नजीकच्या शेतकऱ्यांच्या धानाचे मोजमाप केले जात असल्याचाही आरोप आहे. महागाव परिसरातील २५ टक्के धान खरेदी झालेली नाही. दिवसभरात केवळ ४ ते ५ शेतकऱ्यांच्या धानाचे वजन काटा केला जातो. मात्र वेटिंग लिस्ट फार मोठी आहे. अद्याप ७५ टक्के शेतकरी धान खरेदी केंद्रावर आले नाहीत. त्यामुळे एकापेक्षा अधिक वजन काट्यांची आवश्यकता आहे.शिवाय ते सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स हवेत असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.ज्या प्रमाणात शेतकऱ्यांची वेटिंग लिस्ट आहे. त्या प्रमाणात धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी धान आणून ठेवले नाहीत. त्यामुळे यातील गुपीत उलगडले नाही. दुसऱ्या वजनकाट्याने धान खरेदी सुरू केली नाही तर धान खरेदी केंद्रच बंद पाडण्याचा इशारा यशवंत परशुरामकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केलेल्या तक्रारीतून दिला आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड