शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

‘त्या’ मार्गाची मंत्र्यांनी केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 9:51 PM

प्रमुख राज्य महामार्ग ११ वर ठिकठिकाणी असलेल्या खड्यांची रविवारी सकाळी राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाहणी केली.

ठळक मुद्देजिल्ह्यात दुष्काळाचे सावट : महसूलमंत्र्यांनी शेतकºयांकडे फिरविली पाठ

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : प्रमुख राज्य महामार्ग ११ वर ठिकठिकाणी असलेल्या खड्यांची रविवारी सकाळी राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाहणी केली. लोकमतने रविवारी प्रकाशित केलेल्या बातमीतील जागेची पाहणी केली हे विशेष.ना.पाटील महसूल मंत्री असतांना सुध्दा त्यांनी केवळ रस्त्यांचीच पाहणी करुन जनतेचा हिरमोड केला. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांमध्ये असंतोष व्यक्त केला जात आहे.‘मंत्र्यांच्या धास्तीने रस्त्यांना नववधूचा साज’ या मथळ्याखाली अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील रस्त्यांची दुर्दशा लोकमतने रविवारच्या अंकात मांडली. मंत्री येणार म्हणून प्रमुख राज्य महामार्ग ११ वर ज्या जोमाने काम सुरु होते. त्यावरुन तो नववधूचा साज असल्याचा भास होत होता मात्र स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ डांबर मिश्रीत गिट्टीचे ठिगळ लावून मंत्र्यांच्या वाहनाचे हेलकावे कमी केले. मंत्र्यांच्या वाहनाची क्षती होऊ नये हा नियम कटाक्षाने पाळल्याचे जाणवले. या घटनाक्रमावरुन मंत्री महोदय, आपण या क्षेत्रात वारंवार या, आमचे चांगभल होईल या समजीने तालुकावासीय सुखावले.ना.पाटील यांचे गोंदिया जिल्हा दौराप्रसंगी तमाम सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी या दौºयात रस्त्यांचा आढावा घेतला. मात्र त्यांनी राज्य महामार्ग क्रं. ११ वर पडलेल्या खड्यांच्या डागडूजीसंदर्भात अधिकाºयांना काय निर्देश दिले ते कळू शकले नाही. उपविभागीय अभियंता सोनूने यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा. नाना पटोले हे सध्या पूर्व विदर्भात शेतकºयांच्या मुद्यावर केंद्र व राज्य सरकारवर आगपाखड करीत आहेत. ते स्वपक्षावरच टिका करीत असल्याने त्यांचे स्थान डगमळीत समजले जात आहे. या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्ह्यात भाजपच्या मंत्र्याचे दौरे वाढल्याचे बोलल्या जात आहे. अशा परिस्थितीत ना. पाटील हे महसूल मंत्री या नात्याने शेतकºयांशी संवाद साधतील ही अपेक्षा फोल ठरली.महसूल अधिकारी नव्हतेना. चंद्रकांत पाटील हे सार्वजनिक बांधकाम मंत्री तर आहेतच शिवाय महसूल मंत्री सुध्दा आहेत. महसूल मंत्री हे मंत्रीमंडळात मुख्यमंत्र्यानंतरचे उच्चपद आहे. मात्र ना. पाटील यांनी रस्ते पाहणीला प्राधान्यक्रम दिले. त्याच्या या दौºयात महसूल विभागाचे अधिकारी हजर नव्हते. अर्जुनी-मोरगावचे तहसीलदार सी.आर.भंडारी हे स्वत: जिल्हाधिकारी कार्यालयात आढाव्यासाठी गेले होते. राज्य महामार्ग क्रं.११ वर वादळी पावसामुळे धानपिकांचे मोठे नुकसान झाले होते. याच मार्गाने ना. पाटील गोंदियाकडे गेले त्यांनी महसूल विभागाच्या अधिकाºयांशी चर्चा करुन शेतकºयांना दिलासा देणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी या महामार्गावरील शेतीची पाहणीच केली नाही, असा शेतकºयांचा आरोप आहे. यामुळे शेतकºयांचा हिरमोड झाला आहे.भाजपच्या पत्रिकेतून पटोले बादसडक-अर्जुनी, अर्जुनी-मोरगाव व गोरेगाव तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंचाचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. सडक-अर्जुनी येथे पालकमंत्री राजकुमार बडोले, खा. परिणय फुके, विधानपरिषदेचे आ. अनिल सोले यांची नावे कार्यक्रम पत्रिकेत आहेत मात्र खा. पटोले यांना भाजप कार्यकर्त्यानी डावलल्याचे दृष्टीस येते. गोरेगावच्या पत्रिकेतही नाना पटोले यांना बाद करण्यात आले होते. यावरून नाना भाजपची चांगलीच गोची करीत असल्याचे लक्षात येत आहे.