शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

रोजगाराच्या शोधात मजुरांचे स्थलांतरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 17:19 IST

पोटासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी: उद्योग आल्यास भटकंती थांबणार

लोकमत न्यूज नेटवर्क सडक-अर्जुनी : यंदा निवडणूक आचारसंहितेमुळे मनरेगाची कामेसुद्धा सुरू झाली नाही. परिणामी रोजगाराच्या शोधात मजूरवर्ग जिल्ह्याबाहेर व परराज्यात स्थलांतरण करीत असल्याचे चित्र आहे. अनेक गावांमध्ये रोजगाराचे पुरेसे साधन नाही, नैसर्गिक हवामानाचे ऋतू बदलतात, तसा मजुरांनासुद्धा रोजगार शोधावा लागतो. उन्हाळ्यात तेंदूपत्ता संकलनाचे काम मिळते.

त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास थोडाफार आधार मिळतो. दरवर्षी मनरेगाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असतात त्यामुळे मजुरांना गाव परिसरातच रोजगार उपलब्ध होतो. मात्र यंदा प्रशासनाने मनरेगाच्या कामाचे नियोजन निवडणूक आचारसंहितेपूर्वी न केल्याने मागील महिनाभरापासून मजुरांच्या हाताला काम नाही.

जिल्ह्यातील मजूर दरवर्षी सोयाबीन कापणी, कापूस वेचणीच्या कामासाठी दुसऱ्या जिल्ह्यात जातात. रोवणी करायला महिला मजूर जातात. तर आंध्रप्रदेशात मिरची तोडणीसाठी दरवर्षी जिल्ह्यातील मजूरवर्ग मोठ्या प्रमाणात जात असतो. या ठिकाणी त्यांना जवळपास दोन महिने रोजगार प्राप्त होतो.

यामुळे त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास थोडीफार मदत होते. एप्रिल ते जून महिन्यापर्यंत तेंदूपत्ता तोडणीचा हंगाम असतो. यासाठीसुद्धा मजूरवर्ग मोठ्या प्रमाणात जिल्ह्याबाहेर जातात. सडक-अर्जुनी तालुक्यासह इतरही तालुक्यातील मजूरवर्ग सध्या तेंदूपत्ता तोडणीसाठी दुसऱ्या जिल्ह्यात जात असल्याचे चित्र आहे.

रोजगार उपलब्ध करावागोंदिया जिल्ह्यात उद्योगांचा अभाव असल्याने शेती शिवाय मजुरांना दुसरे काम नाही. त्यामुळे कृषीवर आधारित रोजगार उपलब्ध झाल्यास मजुरांना कामाच्या शोधात इतरत्र भटकंती करावी लागणार नाही. स्थानिक लोक- प्रतिनिधींनी यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

अनेक गावात रोजगार हमी बंदच■ यावर्षी परिसरातील अनेक गावात रोजगार हमीच्या कामांचा नारळ फुटलाच नाही. रोजगार सेवक तसेच पंचायत समितींनी कामाचा आढावा घेतला नाही, कामे काढलेच नाही. परिणामी मजुरांच्या हाताला काम नसल्याने मजुरांचे स्थलांतरण होत आहे. 

टॅग्स :Migrationस्थलांतरणgondiya-acगोंदिया