शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

ग्रामपंचायतीच्या कामांचे सुक्ष्म नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 21:42 IST

प्रत्येक गावातील सामाजिक व आर्थिक परिस्थितीसह मानसिकताही वेगळी आहे. नियोजनाशिवाय उद्दिष्ट पूर्ण करणे अवघड जाणार आहे.

ठळक मुद्देराजा दयानिधी : तिरोडा पंचायत समिती येथे ग्रामसेवकांचा आढावा

ऑनलाईन लोकमतगोंदिया : प्रत्येक गावातील सामाजिक व आर्थिक परिस्थितीसह मानसिकताही वेगळी आहे. नियोजनाशिवाय उद्दिष्ट पूर्ण करणे अवघड जाणार आहे. शौचालय केवळ एका व्यक्तीसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. उद्दिष्टपूर्तिसाठी ग्रामपंचायतीच्या कामाचे सुक्ष्म नियोजन करा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.तिरोडा पंचायत समितीच्या सभागृहात ग्रामसेवकांचा आढवा घेताना ते बोलत होते.या वेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एस.डी. मुंडे, जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जावेद इनामदार, सहायक गटविकास अधिकारी आर.के. दुबे उपस्थित होते.तिरोडा पंचायत समिती अंतर्गत गुडमॉर्निंग पथकाचे उत्कृष्ट कार्य सुरू आहे. त्याबद्दल प्रसंशोद्गार काढून वैयक्तीक शौचालय, नादुरुस्त शौचालय, शेअरिंग शौचालयांचा ग्रामपंचायतनिहाय आढावा घेण्यात आला. यासोबतच पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजनेचे कार्य वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देवून नरेगा व करवसुलींचा देखील याप्रसंगी आढावा घेण्यात आला.पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश राठोड यांनी वैयक्तिक शौचालय बांधण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.ते म्हणाले, ग्रामपंचायतीसाठी जिल्हा ग्राम विकास निधी असतो. त्यातून लाभार्थ्यांना कर्जाची सुविधा उपलब्ध करुन देता येवू शकते. यासोबतच महिला बचत गटातून सुद्धा कर्ज घेवून लाभार्थ्यांनी वैयक्तिक शौचालयांची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.तसेच संपूर्ण तालुक्यात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाची माहिती देवून हागणदारीमुक्तीचे सातत्य टिकवून ठेवण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे मत गटविकास अधिकारी जावेद इनामदार यांनी व्यक्त केले.आढावा बैठकीत नादुरूत व शेअरिंग शौचालयांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासह स्वच्छतेच्या बाबतीत उत्कृष्ट कार्य करण्यासाठी ग्रामपंचायतचे संपूर्ण अधिकारी आर.टी. निखारे, जी.एम. भायदे, सी.एच. गौतम, आर.जे. बन्सोड यांचा तसेच ग्रामपंचायत चोरखमारा, सर्रा, मारेगाव, नवरगाव, नवेझरी, कुल्पा, बिहिरीया, कवलेवाडा, पालडोंगरी, अर्जुनी, खुरखुडी, पांजरा, सुकळी, मरारटोला, पुजारीटोला, ठाणेगाव, बेरडीपार खु., बोरगाव येथील ग्रामसेवकांचा प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला. सोबतच स्वच्छ भारत मिशनचे गटसमन्वयक संजय राठोड, समूह समन्वयक छाया बोरकर, सुरेश पटले, अनूप रंगारी यांचे सुदधा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी उत्कृष्ट कार्यासाठी कौतुक केले.स्वच्छतादूताचा सत्कारग्रामपंचायत स्तरावर गुडमॉर्निंग पथक राबविण्यात हिरहिरीने सहभाग घेवून गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी चिरेखनी येथील युवक कार्तिक बिसेन उत्कृष्ट कार्य करीत आहे. त्यामुळे त्यांचा स्वच्छतादूत म्हणून प्रशस्तीपत्र देवून विशेष सत्कार करण्यात आला.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत