शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

म्हसवानी येथे तो अपघात नसून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:20 IST

गोंदिया : मुलीची प्रकृती बरी नसल्याने औषध आणण्यासाठी गेलेला इसम जखमी अवस्थेत आढळून येऊन त्यातच मृत्यू झाल्याने अगोदर हा ...

गोंदिया : मुलीची प्रकृती बरी नसल्याने औषध आणण्यासाठी गेलेला इसम जखमी अवस्थेत आढळून येऊन त्यातच मृत्यू झाल्याने अगोदर हा अपघात वाटत होता. मात्र तो अपघात नसून खून असल्याचे मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीत उघडकीस आले असून, डुग्गीपार पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने हे प्रकरण उघडकीस आणले आहे. या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. रविवारी (दि. १३) घडलेल्या या प्रकरणातील मृताचे नाव खुमराज बळीराम रहांगडाले (५५, रा.म्हसवानी) असे आहे.

खुमराज रहांगडाले हे रविवारी (दि. १३) सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान मुलीची प्रकृती बरी नसल्याने औषध आणण्यासाठी दुचाकीने (क्र. एमएच ३५-एआर ७९१९) खोडशिवनी येथे जात असता खोडशिवणी ते म्हसवानी मार्गावर रस्त्याच्या कडेला ते जखमी अवस्थेत मिळून आले होते व त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. प्रकरणी त्यांच्या पुतण्या विजय डेकनलाल रहांगडाले (रा.म्हसवानी) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र सोमवारी (दि. १४) उत्तरीय तपासणी अहवालात त्यांच्या डोक्यावर व कानाजवळ असलेल्या जखमा धारदार हत्याराच्या असल्याचे सांगितले. यावरून मृताचा भाऊ उदेलाल ब‌ळीराम रहांगडाले (५२,रा. म्हसवानी) यांच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३०२ अंतर्गत गुन्हा नोंद केला होता, तर पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून डुग्गीपार पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने पथक गठित करून प्रकरणाचा तपास सुरू केला. यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीवरून, योगेश फागुलाल बोपचे (२७, रा.गर्रा) याला ताब्यात घेतले असता त्याने मित्रांच्या मदतीने खून केल्याचे कबूल केले. त्यानुसार, पमेश पन्नालाल पटले (२५, रा.मरघट रोड, गोंदिया) व विधिसंघर्ष बालकाला ताब्यात घेतले, तर डुग्गीपार पोलिसांनी अंशुमन गोविंदा निमावत (२३, रा.बसंतनगर, गोंदिया) याला भंडारा येथील बसस्थानक येथून व गणेश बंडू येटरे (२०,रा. बसंतनगर, गोंदिया) याला गोंदियातून ताब्यात घेतले.