शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

शाळा बंद असल्याने मुलांसोबतच पालकांचे मानसिक आरोग्य बिघडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:31 IST

गोंदिया : कोरोनामुळे विस्कळीत झालेल्या जनजीवनामुळे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक वेदनांना सामोरे जावे लागत आहे. कोरोनामुळे आप्त जणांचा जीव ...

गोंदिया : कोरोनामुळे विस्कळीत झालेल्या जनजीवनामुळे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक वेदनांना सामोरे जावे लागत आहे. कोरोनामुळे आप्त जणांचा जीव गेला. त्यामुळे कुटुंबीय तणावात आहेत. मागील दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. पालकही विविध प्रकारचे टेंशन घेऊन जगत आहेत. मानसिक आरोग्य बिघडल्यामुळे जणू परिस्थिती हाताबाहेर चालल्याचे चित्र आहे.

देशात ४० सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करीत आहे. भारतात प्रत्येक तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करीत आहे. कोरोनामुळे विस्कळीत झालेल्या जनजीवनाला अनेक शारीरिक, मानसिक आणि सामाजिक वेदनांना सामोरे जावे लागत आहे. कितीतरी कुटुंब आप्त जणांचा जीव गेल्यामुळे पीडित आहेत. कितीतरी लोकांना आपला रोजगार कोरोनामुळे गमवावा लागला आहे. त्यामुळेही लोक अतिशय मानसिक तणावाखाली आहेत. साेबतच मुलांच्या शाळा सुरू झाल्या नाही. आर्थिक गणित बिघडले आहे.

................................

मुलांच्या समस्या

- मागील दीड वर्षांपासून शाळा बंद असल्यामुळे मुले घरी राहून खाणे, झोपणे, मोबाइलवर गेम खेळणे इथपर्यंतच सीमित झाले आहेत.

- मुले घरात राहून लठ्ठ झाली आहेत. शरीराचा व्यायाम कमी होत आहे. घरातच राहात असल्याने त्यांना कंटाळा येऊ लागला आहे.

- मुले पालकांना फिरायला जाण्याचा अट्टाहास करतात. पैश्यांच्या चणचणीमुळे वडीलधारी त्यांना बाहेर फिरायलाही नेत नाही.

.............

पालकांच्या समस्या

- मुलांना ऑनलाइन शिक्षणाकरिता महागडे मोबाइल खरेदी करून दिले. परंतु पाल्यांचा कल व्हिडिओ गेमकडे असल्याने पालक त्रस्त आहेत.

- मुलांना शिकण्यापेक्षा वाईट सवयी तर लागणार नाहीत याची भीती आहे. मुलांना घरी २४ तास सांभाळणे ही मोठी कसरत आहे.

- मुलांच्या भविष्याची चिंता व कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती कमकुवत झाली त्याची चिंता आहे. कौटुंबिक कलहदेखील वाढत आहे.

.........................

कोट

कर्जबाजारीपणा, कौटुंबिक हिंसाचार, कोरोनात आप्त स्वकीयांचा झालेला मृत्यू यामुळे खचून लोकांची मानसिकता खालावत चालली आहे. मुलांच्या भविष्याची चिंता त्यांना सतावत आहे. पुरुषांची मानसिकता आर्थिक आणि सामाजिकमुळे खालावते तर महिलांची मानसिकता भावनिकतेमुळे खालावते. विविध कारणांमुळे असह्य मानसिक वेदना झाल्यामुळे सुटकेची तीव्र इच्छा तयार होते. त्यातून लोक आत्महत्या करतात.

- डॉ. लोकेश चिरवतकर, मानसोपचार तज्ज्ञ, गोंदिया.

.........

कोट

सततच्या बंधनामुळे मानसिकता खालावते. यातून आत्महत्यासारख्या घटनाही घडू शकतात. अशी पाळी कुणावरही येऊ नये यासाठी कुटुंबीयांनी व मित्रमंडळींनी यासाठी तत्पर असायला हवे. सरकारने मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू केले. त्यात मानसोपचार तज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ता यांच्या माध्यमातून निदान आणि उपचार मोफत दिले जाते.

- डॉ. यामिनी येळणे, मानसोपचार तज्ज्ञ, गोंदिया

............

पहिली- १४५६५

दुसरी- १८५४२

तिसरी- २०१७६

चौथी- २०४०६

पाचवी- १९५९६

सहावी- १९४६४

सातवी- २००६३

आठवी-२०६०१

नववी- २०७७२

दहावी- २२५२२