याप्रसंगी चेअरपर्सन वैशाली डुंभरे, सचिव शीला मारगाये, सहसचिव वेदान्ता गंगाभोज, राजेंद्र भाले यांच्यासह देवरी लायनेस क्लबच्या अध्यक्ष संगीता पाटील, सचिव गौरी देशमुख, कोषाध्यक्ष शिल्पा बान्ते, वैशाली संगीडवार, वनिता दहीकार, सरोज शेंद्रे, सुलभा भुते, डॉ. वर्षा गंगणे, अलका दुबे, सुनंदा भुरे, लक्ष्मी पंचमवार, शुभांगी निनावे, चित्रा कडू, रिया पटले, ममता रोकडे, शीतल सोनवाने, ऊर्मिला परिहार, रंजना परिहार, शुभांगी मुनघाटे, अर्चना नरवरे, कमलेश्वरी गौतम, रजनी शर्मा उपस्थित होते. यावेळी प्रांताध्यक्ष पौर्णिमा भाले यांनी क्लबच्या सेवाकार्याबद्दल तर वैशाली डुंभरे यांनी क्लबच्या वाटचालीबद्दल आणि शीला मारगाये यांनी क्लबद्वारे वर्षभरात केलेल्या सेवाकार्याचा अहवाल डिस्ट्रीक्ट व विभागीय क्लबला कशाप्रकारे सादर करावे, याबद्दल मार्गदर्शन केले. देवरी लायनेस क्लबच्या सचिव गौरी देशमुख यांनी क्लबचा वार्षिक अहवाल आणि कोषाध्यक्ष शिल्पा बान्ते यांनी सादर केला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शहरातील गरजू गरीब महिलांना अन्नदानाचे किट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन शीतल सोनवाने यांनी केले, तर आभार ममता रोकडे यांनी मानले.
लायनेस क्लबच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची देवरी येथे भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:46 IST