शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

मेकॅनिकच्या मुलाने केली परिस्थितीवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 10:32 PM

परिस्थिती माणसाच्या प्रगतीत बाधा निर्माण करते. या संकटाने जो खचला तो संपला पण जो आत्मविश्वास बाळगून मनोधैर्य खचू देत नाही तो जिंकतोच.असाच दृढ विश्वास ठेवणाऱ्या येथील प्रितीश घनशाम मस्के या मोटारसायकल मेकॅनिकलच्या मुलाने दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण घेवून विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

ठळक मुद्देप्रितीश मस्के : वैद्यकीय क्षेत्रात जाणार

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : परिस्थिती माणसाच्या प्रगतीत बाधा निर्माण करते. या संकटाने जो खचला तो संपला पण जो आत्मविश्वास बाळगून मनोधैर्य खचू देत नाही तो जिंकतोच.असाच दृढ विश्वास ठेवणाऱ्या येथील प्रितीश घनशाम मस्के या मोटारसायकल मेकॅनिकलच्या मुलाने दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण घेवून विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.प्रितीश हा स्थानिक जी.एम.बी. हायस्कुलचा विद्यार्थी आहे. झरपडा हे त्याचे मूळ गाव. सध्या तो अर्जुनीच्या बरडटोली येथे वास्तव्यास आहे. वडील कला शाखेचे पदवीधर असले तरी रोजगार नाही. म्हणून येथील एका पेट्रोल पंपसमोर छोटीशी टपरी लावून मोटारसायकल दुरुस्तीचे काम करतात. आई गृहिणी आहे. वडील सकाळी ८ वाजतापासून तर रात्रीच्या ८ वाजतापर्यंत आपल्या कामात मश्गुल असतात. प्रितीश जिथे वास्तव्यास आहे तिथे अजीबात शैक्षणिक वातावरण नाही. आई पण दिवसभर घरगुती कामकात व्यस्त असते. पण प्रितीश हा अगदी प्राथमिक शिक्षणापासूनच हुशार आहे. त्याने कधीही शाळेच्या परीक्षेत पहिला क्रमांक सोडला नाही.आई-वडील उच्च शिक्षित नसले तरी प्रितीश पेक्षा मोठी असलेली पल्लवी यवतमाळ येथे बीएससी कृषीचे शिक्षण घेत आहे. प्रितीशला गणित, विज्ञान व सामाजिकशास्त्र या विषयात प्रत्येकी ९९ गुण आहेत. मात्र इंग्रजी विषयात केवळ ७७ गुण आहेत. याचे शल्य त्याला बोचत आहे. त्याने या विषयाच्या पूनर्मुल्यांकनासाठी नागपूर शिक्षण मंडळ कार्यालयात अर्ज केला आहे. इंग्रजी हा त्याचा आवडीचा विषय असून शालेय सराव परीक्षेतही त्याला ९० पेक्षा अधिक गुण आहेत. २५ जून रोजी त्याला गुण पडताळणीसाठी बोर्डात बोलाविले आहे. या विषयात नक्कीच गुण वाढतील असा त्याला आत्मविश्वास आहे. वैद्यकीय क्षेत्राकडे जाण्याची त्याची प्रबळ इच्छा आहे. मात्र वडिलांना वैद्यकीय शिक्षणाचा खर्च झेपणार नाही. परिस्थिती हलाखीची आहे म्हणून इंजिनिअरिंग (अभियांत्रीकी) क्षेत्राकडे वळावे असा निर्धार त्याने केला आहे. काहीही असले तरी मुलाने आवडीच्या क्षेत्राची निवड करावी. त्याच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडू देणार नाही, असा विश्वास वडील घनशाम मस्के यांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीजवळ व्यक्त केला.