शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्ष, उपाध्यक्षांनी नैतिकता पाळत राजीनामे द्यावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 16:59 IST

शहरवासीयांकडून उमटतोय प्रतिसाद : सडक अर्जुनी नगर पंचायत

लोकमत न्यूज नेटवर्क सडक-अर्जुनी : येथील नगरपंचायतीचे नगराध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे त्यांनी आपली नैतिक जबाबदारी समजून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. दुसऱ्या नगरसेवकांना पुढील विकास कामाकरिता संधी द्यावी, असा सूर शहरवासीयांकडून आळवला जात आहे.

नगरपंचायत सडक अर्जुनीच्या निवडणुका सन २०२२ मध्ये घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर अडीच वर्षांकरिता नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जमातीसाठी निघाले होते. अडीच वर्षांकरिता अध्यक्ष म्हणून तेजराम मडावी व उपाध्यक्ष म्हणून वंदना डोंगरवार यांची निवड करण्यात आली होती. 

लोकशाहीमध्ये निवडणुका घेणे शासनाचे कर्तव्य आहे; परंतु राज्यातील निवडणुका शासनाने लांबणीवर टाकल्या, तसेच महाराष्ट्रातील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांचा कालावधी अडीच वर्षांऐवजी पाच वर्षे करण्याचा निर्णय १३ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. याचा फटका महाराष्ट्रातील १०५ नगरपंचायतींना बसला. 

राज्य सरकारने निवडून आलेल्या नगरसेवकांच्या विरोधात जरी निर्णय घेतला असला तरी आपली निवड ही अडीच वर्षांकरिताच होती व नियमानुसार आपल्या पदाचा कालावधी संपला आहे. आता आपण त्याच प्रवर्गातील दुसऱ्या नगरसेवकाला अडीच वर्षे संधी द्यायला पाहिजे, ही नैतिकता जोपासून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा व दुसऱ्यांना संधी द्यावी, असा सूर नगरसेवक व शहरवासीयांकडून आळवला जात आहे. 

त्यांनी दिला राजीनामा सिंदेवाही नगरपंचायतीची निवडणूक अडीच वर्षापूर्वी झाली होती तिथे नगराध्यक्ष म्हणून भास्कर नन्नावार व उपाध्यक्ष म्हणून पूजा रामटेके यांची निवड झाली होती. नियमानुसार आपला अडीच वर्षांचा कालावधी संपल्यामुळे आपली नैतिक जबाबदारी समजून नगराध्यक्ष नन्नावार आणि उपाध्यक्ष रामटेके यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन इतर नगरसेवकांना संधी मिळावी याकरिता एक नवीन आदर्श निर्माण केला. असाच आदर्श सडक अर्जुनी येथील नगराध्यक्षांनी घ्यावा, अशी मागणी देखील केली जात आहे.

"मी स्व-मर्जीने नगराध्यक्षपदावर कायम नाही तर शासनाने वाढविलेल्या कार्यकाळामुळे आहे. मला माझ्या पक्ष श्रेष्ठींनी राजीनामा देऊन पदावरून दूर होण्यास सांगितल्यास निश्चितच मी त्याचे पालन करणार. मात्र, त्यापूर्वी कुणी मागणी करतेय म्हणून मी राजीनामा देणार नाही. मी शासनाच्या नियमानुसारच पदावर कायम आहे."- तेजराम मडावी, नगराध्यक्ष, सडक अर्जुनी

टॅग्स :gondiya-acगोंदिया