तुमचे प्रेम आणि मायेचा ओलावा कायम असू द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 10:13 PM2019-08-16T22:13:18+5:302019-08-16T22:13:51+5:30

बहीम भावाच्या प्रेम आणि रक्षणाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनानिमित्त गोंदिया येथील शेकडो महिलांनी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांना राखी बांधली.गोंदिया येथील बहिणींचे प्रेम आणि त्यांनी दिलेल्या आदराने फुके सुध्दा काही क्षण भावनिक झाले होते.

May your love and the moisture of your mother be lasting | तुमचे प्रेम आणि मायेचा ओलावा कायम असू द्या

तुमचे प्रेम आणि मायेचा ओलावा कायम असू द्या

Next
ठळक मुद्देशेकडो बहिणींनी बांधली ना.परिणय फुके यांना राखी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बहीम भावाच्या प्रेम आणि रक्षणाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनानिमित्त गोंदिया येथील शेकडो महिलांनी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांना राखी बांधली.गोंदिया येथील बहिणींचे प्रेम आणि त्यांनी दिलेल्या आदराने फुके सुध्दा काही क्षण भावनिक झाले होते.
प्रथमच कुठल्या पालकमंत्र्यांला महिलांनी ऐवढ्या मोठ्या प्रमाणात राख्या बांधल्या असव्या. या वेळी फुके यांनी राख्या बांधून घेत तुमचे प्रेम आणि मायेचा ओलावा असाच कायम राहू द्या असे सांगत बहिणींचे आशीर्वाद घेतले.
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानिमित्त गुरूवारी पालकमंत्री पालकमंत्री डॉ.परिणय फुके हे गोंदिया येथे आले होते. या वेळी शेकडो महिलांनी येथील विश्रामगृह येथे जाऊन त्यांना राखी बांधली.
पालकमंत्र्यांना आपल्या भावाचा दर्जा देत या महिलांनी एक नवे नाते जोडले. महिलांनी त्यांना तीलक लावून व ओवाळणी घालून राखी बांधली. राखी बांधल्यानंतर या बहिणींना पालकमंत्र्यांनी जमेल ती मदत करण्याचे व कठीण प्रसंगात साथ देण्याचे वचन दिले. एवढेच नव्हे तर बहिणींना राखीची भेट देऊन त्यांचा आर्शीवादही घेतला.
विशेष म्हणजे जिल्ह्याला आत्तापर्यंत कित्येक पालकमंत्री लाभलेत मात्र गोंदियाच्या महिलांनी एवढा सन्मान व प्रेम केवळ नामदार फुके यांनाच दिले. रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भावना कदम, नगर परिषद सभापती मौसमी परिहार, नगरसेविका हेमलता पतेह, जिल्हा परिषद सभापती शैलजा सोनवाने, माजी सभापती श्रद्धा अग्रवाल, नगरसेविका अफसाना पठाण यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.

Web Title: May your love and the moisture of your mother be lasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.