लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : चीनसह जगभरात झपाट्याने पसरत असल्याने कोरोना आजाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे. भारतातही या आजाराचे २९ रुग्ण संशयीत रुग्ण आढळल्याने सर्तकता बाळगली जात असून जनजागृती व उपाय योजना केली जात आहे. दरम्यान कोरोना आजारामुळे मास्कच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून गोंदिया जिल्ह्यात मास्कचा तुटवडा पडला असून याला जिल्ह्यातील मेडिकल विक्रेत्यांनी सुध्दा दुजोरा दिला आहे.कोरोना आजाराची लागण होऊ नये यासाठी शासन आणि आरोग्य विभागातर्फे जनजागृती केली जात आहे. या आजाराचा संसर्ग होऊ नये म्हणून मास्क वापरण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. त्यामुळे मास्कच्या विक्रीत अचानक वाढ झाली असून अनेक मेडिकल मास्कचा तुटवडा आहे.विशेष म्हणजे गोंदिया येथून कुरियर दिल्ली येथे मास्क पाठविले जात असल्याने मागील दोन दिवसांपासून शहरातील मेडिकलमध्ये मास्कचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर मास्कचा पुरवठा करणाऱ्या कंपन्या सुध्दा जिल्ह्यांना मास्कचा पुरवठा न करता दिल्ली येथे मागणी वाढली असल्याने त्या ठिकाणी पुरवठा करीत असल्याचे गोंदिया येथील औषधे विक्रेते अमित नागपूरे यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.रेल्वे विभागाची पत्राला केराची टोपलीहावडा-मुंबई मार्गावरील एक महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानक असलेल्या गोंदिया रेल्वे स्थानकावरुन दररोज २५ हजाराहून अधिक प्रवाशी ये-जा करतात.त्यातच कोरोना आजार हा संसर्गजन्य असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी विशेष दक्षता बाळगली जात असून नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. रेल्वे महाव्यवस्थापकांनी गोंदिया स्टेशन व्यवस्थापकांना पत्र देऊन रेल्वे स्थानकावर कोरोनाची जनजागृती करण्यासाठी पोस्टर व बॅनर लावण्याचे निर्देश दिले. मात्र पत्र मिळल्याच्या शुक्रवारी दुसºया दिवशीही कुठलीही उपाय योजना करण्यात आली नाही.नगर परिषदही उदासीनस्थानिक नगर परिषदेने सुध्दा कोरोनो आजाराच्या पार्श्वभूमिवर कुठलीच जनजागृती मोहीम हाती घेतलेली नाही. शहरात आजारापासून कशी प्रतिबंधात्मक उपाय योजना करावी यासंदर्भातील साधे पोस्टर किंवा बॅनर लावण्यात आले नाही. त्यामुळे नगर परिषदेला शहरवासीयांच्या आरोग्याची किती काळजी हे दिसून येते.
जिल्ह्यात मास्कचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 06:00 IST
कोरोना आजाराची लागण होऊ नये यासाठी शासन आणि आरोग्य विभागातर्फे जनजागृती केली जात आहे. या आजाराचा संसर्ग होऊ नये म्हणून मास्क वापरण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. त्यामुळे मास्कच्या विक्रीत अचानक वाढ झाली असून अनेक मेडिकल मास्कचा तुटवडा आहे.
जिल्ह्यात मास्कचा तुटवडा
ठळक मुद्देकोरोना जनजागृतीप्रती उदासिनता : नगर प्रशासनाची डोळेझाक