शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

लग्न जुळू देत नाही..! दोन गटांत हाणामारी, ९ गंभीर जखमी

By नरेश रहिले | Updated: November 1, 2023 17:05 IST

महाराष्ट्र पोलिस कायदा अन्वये गुन्हा दाखल

गोंदिया : लग्नसराईचा हंगाम सुरू होणार आहे. आता मुला-मुलींचे लग्न जुळवण्याचे काम सुरू आहे. परंतु, एक मुलगा लग्न जोडण्यासाठी आटापिटा करीत असताना त्याची चुकीची माहिती समाजात काही लोक पसरवत आहेत. मुलीकडील मंडळींना मुलाविषयी चुकीची माहिती दिल्याने लग्न जमले नाही. परिणामी चुकीची माहिती देणाऱ्यांच्या विरोधात मुलाकडील मंडळीनी दंड थोपटले. या घटनेत ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता दोन्ही गटांनी एकमेकांना मारहाण केल्याने नऊ जण गंभीर जखमी झाले. यात ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

सालेकसा तालुक्यातील कुणबीटोला (गोवारीटोला) येथील योगेश रेखलाल रत्नाकर (२३) याला पाहण्यासाठी मुलीकडील मंडळी आले होते. परंतु तो मॅटेडोरचा ड्रायव्हर असल्याचे सांगितल्यामुळे लग्न जमले नाही. त्यामुळे आरोपी योगेश रेखलाल रत्नाकर (२३), रेखलाल चंदनलाल रत्नाकर (५०), चंदनलाल फिरतू रत्नाकर(६०), महेश चंदनलाल रत्नाकर (४०), निर्मला रेखलाल रत्नाकर (४२) व भूमेश चंदनलाल रत्नाकर (३५, सर्व रा. कुणबीटोला) यांनी काठीने, विटाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

या मारहाणीत लक्ष्मीनारायण चिंतामण रत्नाकर (३४), शांता चिंतामण रत्नाकर (४८), आकाश रूपलाल रत्नाकर (२२), चिंतामण भय्यालाल रत्नाकर (५५) हे जखमी झाले. एका गटाला मारहाण झाल्याने दुसऱ्या गटातील आरोपी लक्ष्मीनारायण चिंतामण रत्नाकर (३४), चिंतामण भय्यालाल रत्नाकर (५५), आकाश रूपलाल रत्नाकर (२२), भय्यालाल फिरतू रत्नाकर (६५), शांता चिंतामण रत्नाकर (४८) यांनीही मारहाण केली. योगेश रेखलाल रत्नाकर (२३), रेखलाल चंदनलाल रत्नाकर (५०), चंदनलाल फिरतू रत्नाकर (६०), निर्मला रेखलाल रत्नाकर (४२) यांनी विटा, काठी व थापड-बुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेसंदर्भात सालेकसा पोलिसांनी दोन्ही गटांवर भादंवि कलम ३२४, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६ सहकलम ३७ (१), (३), १३५ महाराष्ट्र पोलिस कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgondiya-acगोंदिया