लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासनाने कृषी विभागाच्या विविध योजनांचा व नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याची नुकसानभरपाई मिळण्यासाठी ई-पीक पाहणी करणे अनिवार्य केले आहे. पण गेल्या पंधरा दिवसांपासून ई-पीक ॲपमध्ये बिघाड आल्याने त्यात नोंदणी होत नसल्याने रब्बी धान उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे. रब्बीत हंगामात केवळ ३६ हजार ९०० शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे.
रब्बी हंगामातील धान, मका व इतर पिकांची कापणी व मळणी काहीच दिवसांत सुरू होणार आहे. त्यानंतर बरेच शेतकरी हे हमीभावाने शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करतात. पण शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य आहे. ई-पीक पाहणी ॲपमध्ये नोंदणी करून त्यात पीक पेऱ्याची नोंद करून शेतात लावलेल्या पिकाचा लाईव्ह फोटो अपलोड करावा लागतो. ई-पीक पाहणीमध्ये नोंद झाल्यानंतरच शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करून धानाची हमीभावाने विक्री करता येते. पणगेल्या पंधरा दिवसांपासून हे ॲप चालत नसल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकरी नोंदणीपासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांची वेळेत नोंदणी पूर्ण न झाल्यास त्यांना हमीभाव व नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास नुकसानभरपाई मिळण्यापासून वंचित राहावे लागणार आहे.
६० हजार हेक्टरवर विविध पिकांची लागवडजिल्ह्यात रब्बी हंगामात ४६ हजार हेक्टरवर धान तर उर्वरित क्षेत्रावर इतर पिकांची लागवड करण्यात आली आहे. तर आतापर्यंत केवळ ३६ हजार २०० शेतकऱ्यांनीच ई-पीक पाहणी केली आहे. ई-पाहणी अॅपमध्ये वारंवार खोडा निर्माण होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
१३९५३ धान विक्रीसाठी केली नोंदणीरब्बी हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभावाने धानाची विक्री करण्यासाठी जिल्ह्यातील १३९५३ शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत नोंदणीकेली असल्याचे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकाऱ्यांनी सांगितले.
तालुकानिहाय ई-पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्यातालुका मोबाइलद्वारे नोंदणी अधिकाऱ्यांनी केली नोंदणीअर्जुनी मोर. २८८८ १३३०आमगाव २७१५ ७०३गोंदिया ७५९९ ११३८गोरेगाव २२५२ ११६१तिरोडा ४०४८ ५२५देवरी ३०१४ १७६८सडक अर्जुनी २५२५ ३९३सालेकसा ३४६४ १३७७एकूण २८५०५ ८३९५