शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

मनोहरभाई पटेलांनी शिक्षित करण्याचे महान कार्य केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 05:00 IST

खा. पटेल म्हणाले, मनाेहरभाई पटेल हे दृष्टी बाळगणारे होते. त्यांनी गोंदिया-भंडारा जिल्ह्यांत शिक्षणाची गंगा आणून हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे महान कार्य केले. आम्ही संस्थेच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम घेत असतो; पण या जयंती कार्यक्रमाचे फार वेगळे महत्त्व असून तो आमच्या भावनांशी जुळलेला असल्याचे खा. पटेल यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन माजी आ. राजेंद्र जैन यांनी केले. या कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ठळक मुद्देराज्यपाल भगतसिंह कोश्यारी : गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक वितरण सोहळा; विविध मान्यवरांची उपस्थिती

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मनोहरभाई पटेल हे स्वत: शिक्षित नसताना गोंदिया-भंडारा जिल्ह्यांत शाळा-महाविद्यालये सुरू करून या दोन्ही जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे उघडली. यामुळेच गुणवंत विद्यार्थी घडत आहे. त्यांनी देश-विदेशात नाव कमावले आहे. मनोहरभाई पटेलांनी स्वत: अशिक्षित असल्याचा न्यूनगंड कधीच बाळगला नाही, तर समाज कसा शिक्षित करता येईल, या ध्येयाला प्रेरित होऊन कार्य केले. यासाठी त्यांनी तीव्र इच्छाशक्ती आणि समर्पणाची भावना जपल्यानेच त्यांना हे महान कार्य करता आले, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. गोंदिया शिक्षण संस्था, मनोहरभाई पटेल स्मृती समिती, गुजराती राष्ट्रीय केलवणी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मनोहरभाई पटेल यांचा ११५ वा जयंती कार्यक्रम मंगळवारी गोंदियाच्या नमाद महाविद्यालयाच्या ऑडिटोरियम सभागृहात आयोजित करण्यात आला  होता, यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खा. प्रफुल पटेल हे होते. यावेळी आ. विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले, सहषराम कोरोटे, डॉ. नामदेव उसेंडी, नरेंद्र भोंडेकर, अभिजीत वंजारी, नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी खासदार खुशाल बोपचे, माजी मंत्री नाना पंचबुद्धे, विलास श्रुंगरपवार, अनिल बावनकर, के. आर. शेंडे, विजय शिवणकर उपस्थित होते. राज्यपाल कोश्यारी म्हणाले, सामाजिक कार्य करीत असताना समर्पण आणि त्यागाची भावना जपावी लागते. मनोहरभाई पटेल यांनीसुद्धा हाच धागा पकडून कार्य केले. त्यामुळेच त्यांना हे सर्व करता आले. ‘सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास’ हा मूलमंत्र जपून सर्वांनी कार्य केल्यास समाजाची प्रगती शक्य आहे. मनोहर पटेल यांनी शिक्षणरूपी लावलेल्या रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात करण्याचे कार्य खा. प्रफुल पटेल हे करीत असून ही खरोखरच गौरवाची बाब आहे. यापासून सर्वांनी प्रेरणा घ्यावी, असेही ते म्हणाले. खा. पटेल म्हणाले, मनाेहरभाई पटेल हे दृष्टी बाळगणारे होते. त्यांनी गोंदिया-भंडारा जिल्ह्यांत शिक्षणाची गंगा आणून हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे महान कार्य केले. आम्ही संस्थेच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम घेत असतो; पण या जयंती कार्यक्रमाचे फार वेगळे महत्त्व असून तो आमच्या भावनांशी जुळलेला असल्याचे खा. पटेल यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन माजी आ. राजेंद्र जैन यांनी केले. या कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्यपालांनी केला मोदींचा गुणगौरव 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’ हाच मूलमंत्र आत्मसात करून कार्य करीत आहेत. त्यांचे धडाडीचे निर्णय, दूरदृष्टी आणि आक्रमक शैलीमुळे भारताचे नाव आज सर्वत्र आदराने घेतले जाते. ही खरोखर देशवासीयांसाठी गौरवाची बाब आहे. हाच मूलमंत्र सर्वांनी जोपासण्याची गरज असल्याचे सांगत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुणगौरव केला. 

या गुणवंतांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कारइयत्ता दहावी, बारावी आणि पदवी अभ्यासक्रमात गोंदिया आणि  भंडारा जिल्ह्यांतील गुणवंत विद्यार्थ्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सुवर्णपदक व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. आस्था अनिलकुमार बिसेन व निष्ठा राजेशसिंह, श्रेया ओमप्रकाश रहांगडाले, ट्विंकल संजय उके, आदिती प्रेमकुमार भक्तवर्ती, जयेश पुरन रोचवानी, पुष्पा ग्यानसिंग लिल्हारे, रिया गोवर्धन नोतानी, साक्षी शैलेंद्र प्रसाद, अनिकेत दिलीप खंडारे, ऋतुजा जागेश्वर वाघाये, पूजा अश्विन मेहता, भाग्यश्री घनश्याम बोरकर, रोशनी पिजानी, रूपाली प्रदीप बुरडे, श्वेता अनिल पडोले आदी गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश होता. मी दोन्ही जिल्ह्यांचा पालक - प्रफुल पटेल गोंदिया-भंडारा जिल्ह्यांत कार्य करीत असताना आपण कधीच कुणाबद्दल भेदभावाची भावना बाळगून कार्य केले नाही, तर दोन्ही जिल्ह्यांचा पालक म्हणूनच सदैव कार्य करीत आहे. यापुढे सुद्धा या दोन्ही जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास साधता येईल, याच दृष्टीने आपले प्रयत्न असणार असल्याची ग्वाही खा. प्रफुल पटेल यांनी दिली.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी