शहरं
Join us  
Trending Stories
1
BIhar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
2
"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार
3
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?
4
"त्या दोघांचा मृत्यू ट्रेनमधून पडून नाही, तर…"; नाशिकमधील अपघाताचं धक्कादायक कारण समोर, जखमीने दिली माहिती
5
शेकडो वर्षे जुने जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर; जाणून घ्या इतिहास आणि मनोरंजक तथ्ये...
6
"मी स्वत:ला भाग्यवान समजतो...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये घरवापसी केल्यानंतर ओंकार भोजनेची पहिली प्रतिक्रिया
7
अजबच! प्रत्येकजण कॉफीमध्ये मीठ का घालतंय? व्हायरल ट्रेंडमागे लपलंय इन्ट्रेस्टिंग सायन्स
8
या भारतीय क्रिकेटरनं घेतली निवृत्ती; रैना-कोहलीच्या कॅप्टन्सीत पदार्पणात रचला होता इतिहास
9
KL Rahul नं खरेदी केलं चालतं-फिरतं हॉटेल! 'ही' लग्जरी इलेक्ट्रिक कार देती ढासू रेंज, जाणून घ्या फीचर अन् किंमत
10
Diwali Sale: आयफोन १७ ला टक्कर देणाऱ्या गुगल पिक्सेल १० च्या खरेदीवर आतापर्यंतची तगडी सूट!
11
‘रो-को’चा फ्लॉप शो! गावसकर म्हणाले, "पुढे दोघांनी ही गोष्ट केली तर आश्चर्यचकित होऊ नका!"
12
युट्यूब शॉर्ट्स की इन्स्टाग्राम रील्स, कुठे होते सर्वाधिक कमाई? जाणून घ्या नेमकं गणित...
13
‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  
14
वार्षिक भविष्य २०२५-२६: महालक्ष्मी कृपेने पुढील वर्षभर कोणत्या राशींना धन, यश आणि भाग्याची साथ?
15
'वॉर २'च्या अपयशानंतर अयान मुखर्जीने 'धूम ४'च्या दिग्दर्शनातून घेतली माघार, 'ब्रह्मास्त्र २'ची तयारी सुरु
16
ऐन दिवाळीत माधुरी दीक्षितला करावं लागलेलं टक्कल, खुद्द 'धकधक गर्ल'ने केला खुलासा
17
"मी मोदींचा भक्त, भाजप म्हणजे घर"; महेश कोठारे म्हणाले, "मुंबईवर कमळ फुलणार, महापौरही इथूनच"
18
पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...
19
८०० वर्षांनी वैभव लक्ष्मी-महालक्ष्मी योगात लक्ष्मी पूजन: महत्त्व, महात्म्य, लक्ष्मी आरती
20
दहशत माजवणारा साद रिझवी कुठे गायब झाला? पीएम शहबाज शरीफ यांच्याही आणलेले नाकी नऊ!

एक मच्छरने जिल्हे को हिला डाला! मलेरिया व डेंग्यू फोफावतोय, वेळीच उपाययोजना झाल्या गरजेच्या

By कपिल केकत | Updated: August 10, 2023 19:56 IST

डोळ्यांच्या साथीने जिल्ह्याला विळख्यात घेतले असतानाच आता डासांनीही आपली कमाल दाखविण्यास सुरुवात केली आहे.

गोंदिया : डोळ्यांच्या साथीने जिल्ह्याला विळख्यात घेतले असतानाच आता डासांनीही आपली कमाल दाखविण्यास सुरुवात केली आहे. डासांचा प्रकोप वाढत चालला असून, यातूनच जिल्ह्यात मलेरिया व डेंग्यू फोफावताना दिसत आहे. या वर्षातील सात महिन्यांत जिल्ह्यात डेंग्यूचे २६ तर मलेरियाचे १०८ रुग्ण आढळून आहे आहेत. यामुळे जिल्हावासीयांना आता प्रशासनाच्या भरवशावर न राहता स्वत:च उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.

काही वर्षांपूर्वी ‘साला एक मच्छर...’ हे गाणे चांगलेच गाजले होते. मच्छर हा जरी लहानसा कीटक असला तरी तो माणसाचा जीव घेऊ शकतो हेसुद्धा नाकारता येत नाही. हेच कारण आहे की, एवढ्या मोठ्या माणसालाही त्यापासून आपली सुरक्षा करवून भाग पडते. गोंदिया जिल्ह्यात बाराही महिने मच्छरांचा त्रास आहे. मात्र, पावसाळा म्हटला म्हणजे मलेरियाच्या मच्छरांसोबतच डेंग्यूच्या मच्छरांचीही पैदास होते. डेंग्यू म्हटला म्हणजे धडधड वाढू लागते; कारण, डेंग्यू अनेकदा जीवघेणा ठरतो. एवढे असूनही जिल्ह्याचा वाली कोणीही नसून आपली सोय आपणच करा, हे धोरण राबवावे लागते.

यंदाही जिल्ह्यात तीच स्थिती असून, या सात महिन्यांत जिल्ह्यात मलेरिया व डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे, ग्रामीण भागात मलेरिया व डेंग्यूचे रुग्ण आढळून येतात यात काही नवल नाही. मात्र यंदा गोंदिया शहरात तब्बल सात रुग्ण आढळून आले आहेत. यावरून नगर परिषद शहरवासीयांच्या आरोग्याची किती तत्परतेने काळजी घेत आहे याची प्रचिती येते.

सालेकसा तालुका मलेरियाचा अड्डाजिल्ह्यात या सात महिन्यांत मलेरियाचे १०८ रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे, डासजन्य आजारांच्या बाबतीत सालेकसा तालुका पूर्वीपासूनच पुढे राहिला आहे. अशात यंदाही सालेकसा तालुका मलेरियाचा अड्डा बनला आहे. तालुक्यात तब्बल ५३ रुग्ण आढळून आले असून, त्यानंतच गोरेगाव तालुक्यात १४ तर देवरी तालुक्यात १३ रुग्ण आढळून आले आहेत.

शहर व ग्रामीणमध्येच डेंग्यू वरचढजिल्ह्यात डेंग्यूचे एकूण २६ रुग्ण आढळून आले असून, त्यात सात रुग्ण शहरातील तर सहा रुग्ण ग्रामीणमधील आहेत. यावरून गोंदिया शहर व ग्रामीण भागात डेंग्यू पाय पसरत असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे येथेच डेंग्यू डासांची उत्पत्ती होत असून, त्यामुळेच डेंग्यूचा धोका वाढताना दिसत आहे.

नगर परिषद आपल्यातच मस्त ग्रामीण भागात हिवताप नियंत्रण विभागाकडून डासजन्य आजार पसरू नयेत यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातात. तर शहरात नगर परिषदेची जबाबदारी असते. मात्र, गोंदिया नगर परिषदेला शहरातील जनतेशी काहीच घेणे-देणे नाही. हेच कारण आहे की, डासांचा नायनाट करण्यासाठी काहीच उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने शहरात डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. यामुळेच शहरवासीयांना आपली सुरक्षा आपणच करावी लागणार आहे.

जिल्ह्यातील डेंग्यू व मलेरियाची आकडेवारीतालुका - मलेरिया - डेंग्यू

  • गोंदिया शहर- ०१-०७
  • गोंदिया ग्रामीण - ०१-०६
  • तिरोडा - ०६-००
  • आमगाव - ०६-०४
  • गोरेगाव - १४-०१
  • देवरी - १३-००
  • सडक-अर्जुनी - ०६-०४
  • सालेकसा - ५३-०३
  • अर्जुनी-मोरगाव - ०७-०१
टॅग्स :gondiya-acगोंदियाMalariaमलेरिया