शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

गणपतीचा प्रसाद बनवताय; परवानगी घेतली आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 13:43 IST

गणेशोत्सव मंडळांकडून महाप्रसादाचे वितरण: अन्न व औषध प्रशासनाची नजर

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्ह्यातील गणेशोत्सवाची परिसरासह लगतच्या मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यांतही ख्याती आहे. हेच कारण आहे की, येथील गणेशोत्सवाची भव्यता बघण्यासाठी दूरवरून भाविक गणरायाच्या दर्शनासाठी येतात, या भाविकांसाठी बहुतांश मंडळांकडून महाप्रसादाचे सोय केली जाते. यामध्ये भाविकांना मंडप परिसरातच प्रसाद खाण्याची व्यवस्था केली जाते. शिवाय, डब्यांच्या स्वरूपातही प्रसाद उपलब्ध करून दिला जातो.

प्रसाद वितरण करायचा म्हणजे, अन्न व औषध प्रशासनाची गरज असते. त्यानुसार, मंडळांना अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते व त्यानंतरच ते प्रसाद वितरित करू शकतात. यंदाही शहरात गणेशोत्सवाची धूम असून कित्येक मंडळांकडून 'भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र असे करताना मंडळांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नियम व नियमन २०११ अंतर्गत काळजी घेणे गरजेचे आहे. 

जिल्ह्यात हजारावर गणेश मंडळांची नोंदणी जिल्ह्यात गणेशोत्सव धडाक्यात साजरा केला जात असून शहरासह ग्रामीण भागातही याची धूम असते. हेच कारण आहे की, येथील गणेशोत्सव प्रसिद्ध असून भाविकांची गर्दीही दिसून येते. गणेशोत्सव साजरा करताना सार्वजनिक मंडळांना पोलिससह अन्य विभागांची परवानगी घ्यावी लागते. त्यानुसार, जिल्ह्यात हजारावर सार्वजनिक मंडळांकडून गणेशोत्सव साजरा केला जातो.

अन्न व औषध प्रशासनाची परवानगी गरजेची गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांकडून भाविकांना महाप्रसाद वितरित केला जातो. यासाठी अन्न व औषध प्रशासनाची परवानगी गरजेची असते. अन्न व औषध प्रशासनाकडून ५ वर्षांसाठी ही परवानगी दिली जाते. त्यानुसार मंडळांकडे जुनी परवानगी असावी. मात्र यंदा नव्याने एकाही मंडळाने अर्ज केलेला नाही.

प्रसाद बनवताना काय काळजी घ्याल?प्रसाद तयार करताना स्वच्छता बाळगावीमंडळांकडून भाविकांसाठी प्रसाद तयार करताना प्रसाद तयार करण्याच्या ठिकाणी स्वच्छता बाळगावी. तयार केलेला प्रसाद काचेच्या झाकणात किवा पारदर्शक प्लास्टिकच्या आवरणात झाकून ठेवावा. जेणकरून प्रसादाला धूळ, माती, माश्या, मुंग्या व इतर कीटकांचा प्रादुर्भाव होणार नाही. भाविकांना शिळे अन्नपदार्थ सेवनास देऊ नये.

हातमोजे व स्वच्छ कापडांचा वापर करावा. प्रसाद हाताळणाऱ्या व्यक्तींचे कपडे स्वच्छ असावेत. त्यांनी साबणाने हात स्वच्छ धुऊनच कामास सुरुवात करावी. संसर्गजन्य आजार असणाऱ्या व्यक्तीने प्रसाद बनविणे व हाताळण्याची कामे करू नयेत. प्रसाद हाताळणाऱ्या व्यक्तीने नाक, कान, डोके, केस खाजवणे वा डोळे चोळणे, शिकणे, धुंकणे, नाक शिकरणे, तंबाखू वा धूम्रपान करणे टाळावे. त्यांची नखे व्यवस्थित कापलेली असावी व त्यात घाण साचलेली असू नये. हात पुसण्यासाठी स्वच्छ कापडांचा वापर करावा. 

परवानाधारक दुकानातूनच खरेदी कराप्रसादासाठी कच्च्या अन्नपदार्थांची खरेदी परवा- नाधारक दुकानदाराकडूनच करावी. खरेदी केलेल्या सामानाची बिले सांभाळून ठेवावी. जास्तीत जास्त कच्चे धान्य पाकीटबंद खरेदी करावे. सुटे धान्य खरेदी करणे टाळावे. तसेच खरेदी करताना पाकिटावर असलेली एक्सपायरी डेट बघूनच खरेदी करावी.

"गणेशोत्सवात मंडळांकडून भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जात आहे. मात्र असे करताना मंडळांनी अन्न व औषध प्रशासनाचा परवाना घेणे गरजेचे आहे. यामुळे मंडळांनी योग्यरीत्या परवाना घेऊन महाप्रसादाचे वाटप करावे."- संजय शिंदे, उपायुक्त अन्न व औषध प्रशासन, गोंदिया

टॅग्स :gondiya-acगोंदिया