शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

दिव्यांगांच्या राज्य क्र ीडा स्पर्धा यशस्वी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 21:25 IST

दिव्यांग व्यक्तींच्या अंगी सुप्त क्र ीडा गुण असतात. त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त क्र ीडागुणांना चालना देण्यासाठी राज्यात १९९७ पासून ......

ठळक मुद्देराजकुमार बडोले : २३ ते २५ मार्चदरम्यान स्पर्धा

ऑनलाईन लोकमतगोंदिया : दिव्यांग व्यक्तींच्या अंगी सुप्त क्र ीडा गुण असतात. त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त क्र ीडागुणांना चालना देण्यासाठी राज्यात १९९७ पासून दिव्यांगांसाठी क्र ीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. देवरीसारख्या दुर्गम, आदिवासी बहुल व मागास भागात पहिल्यांदाच दिव्यांगांच्या राज्यस्तरीय क्र ीडा स्पर्धा येत्या २३ ते २५ मार्च दरम्यान आयोजित करण्यात येत असून या स्पर्धा यशस्वी करा असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात देवरी येथील क्र ीडा संकुलात समाज कल्याण व विशेष सहाय्य विभाग तसेच कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्था यांच्या संयुक्तवतीने २३ ते २५ मार्च दरम्यान आयोजित दिव्यांगांच्या राज्यस्तरीय क्र ीडा स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेताना शनिवारी (दि.१०) ते बोलत होते. यावेळी अपंग कल्याण आयुक्त नितीन पाटील, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे, कृष्णा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झामिसंग येरणे प्रमुख्याने उपस्थित होते.पुढे बोलताना बडोले यांनी, दिव्यांगांच्या विकासासाठी ग्रामपंचायतींना तीन टक्के निधी देण्यात येत असून त्यांची रिक्त पदे भरण्याचे काम करण्यात येत आहे. त्यांना दिव्यंगत्वाचे आॅनलाईन प्रमाणपत्र देण्यात येत आहे. देवरीयेथे होणाºया राज्यस्तरीय दिव्यांग क्र ीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राज्यातून ३५०० विद्यार्थी व ५०० कला आणि विशेष शिक्षक येत आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाने त्यांना रेल्वे स्टेशन व बसस्थानकावरु न क्र ीडा स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचिवण्यासाठी बसेसची व्यवस्था करावी. तसेच आरोग्य विभागाने क्र ीडा स्पर्धेच्या ठिकाणी १०८ क्र मांक अँम्बुलन्सची व्यवस्था करावी. ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना या स्पर्धा बघण्यासाठी आणावे असे सांगितले.अपंग कल्याण आयुक्त पाटील यांनी, दिव्यांग खेळाडूंना स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचिवण्याचे, त्यांच्या निवास व भोजनाच्या दृष्टीने नियोजन करावे. त्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. मुलामुलींसाठी मुकबधीर, मतीमंद,अस्थिव्यंग आणि अंध प्रवर्गात या क्र ीडा स्पर्धा होणार असल्याचे सांगितले.समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त गायकवाड यांनी, क्र ीडा स्पर्धेदरम्यान खेळाडूंसाठी मोबाईल शौचालय, ई-रिक्शाची सुविधा तसेच खेळतांना खेळाडूला दुखापत झाल्यास औषधोपचारी सुविधा उपलब्ध करु न दयावी.क्रीडा स्पर्धेदरम्यान बसस्थानक गोंदिया व देवरी नियंत्रण कक्ष सुरु करावे. खेळाडूंसाठी काळजीवाहकांची व्यवस्था करावी. या दरम्यान वीज पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता वीज वितरण कंपनीने घ्यावी असे सांगितले. तरक्र ीडा स्पर्धेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या तयारीची माहिती येरणे यांनी दिली. सभेला क्र ीडा स्पर्धेशी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आभार मिलींद रामटेके यांनी मानले.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोले