शेतकऱ्यांना सल्ला : प्रात्यक्षिकासाठी ५० शेतकऱ्यांची निवडइसापूर : यशस्वी शेतीसाठी पीक पाण्याचे योग्य नियोजन करुन शेती केल्यास उत्पन्नात नक्कीच भर पडून शेतकऱ्यांचा विकास होईल. धान पिकाची पेरणी करतांनी बीज प्रक्रिया, खताचे नियोजन, किटकनाशकाचे योग्य नियोजन केल्यास उत्पन्नात भर पडेल, असे प्रतिपादन तालुका कृषी कार्यालयाचे आर.के.चांदेवार यांनी केले. इसापूर ग्रा.पं. भवनात कृषी सप्ताह जागृती कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच गजानन चांदेवार, सरपंच दामोधर चांदेवार, एम. ठाकुर,एन.एच. मुनेश्वर, बी.टी.एम. कोहाडे, कृषी सहाय्यक बी.एन. येरणे, संतोष रोकडे, सरपंच आनंदराव सोनवाने व शेतकरी उपस्थित होते.याप्रसंगी ठाकूर यांनी धान पिकावरील रोग, किडे यांचा प्रादुर्भाव झाल्यास किटक नाशकांची फवारणी, बिजामृत, जीवामृत, निंबोळी अर्क तयार करण्याच्या पद्धती यावर मार्गदर्शन केले. एन.एच. ठाकुर यांनी पीक विमा योजना, सेंद्रीय शेती यावर मार्गदर्शन केले. इसापूर गाव हे संकरीत धान पीक प्रात्याक्षीक योजनेत ५० शेतकऱ्यांची निवड या योजनेत करुन त्यांच्याकडे सहयांद्री ३ या संकरीत धान वाणाची लागवड केली जाणार आहे. या वाणासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन बी.एच. येरणे यांनी तर आभार संतोष रोकडे यांनी मानले. यावेळी शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)
यशस्वी शेतीसाठी योग्य नियोजन करा
By admin | Updated: July 9, 2016 02:04 IST