गोंदिया : जिल्ह्यातील प्रत्येक गावात बुथ कमिट्यांचे सशक्तीकरण करण्यासाठी सर्व आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांशी समन्वय साधून आगामी काळातील निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर द्यावा. पक्षाच्या माध्यमातून खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात झालेल्या विकास कामांना जनतेपर्यंत पोहचविण्याचा काम आपण करावे. यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रम राबवून पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेत क्रियाशील करा, अशा सूचना माजी आमदार राजेंद्र जैन यांनी दिल्या.
जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने पक्ष कार्यालयात आयोजित सर्व आघाडी व सेलचे जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्षांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीत जिल्हा व तालुका पातळीवरील कार्यकारिणीचा आढावा घेण्यात आला. सोबतच पक्ष संघटनसंबंधी विषयांवर विविध चर्चा करण्यात आली. यावेळी देवेंद्रनाथ चौबे, राजलक्ष्मी तुरकर, विशाल शेंडे, प्रभाकर दोनोडे, डी.यू.रहांगडाले, राकेश लंजे, प्रेम रहांगडाले, मनोज डोंगरे, घनश्याम मस्करे, गणेश बर्डे, किशोर पारधी, रफ़ीक खान, अब्दुल मतीन शेख, एफ. आर. टी. शाह, कल्पना बहेकार, सुशीला हलमारे, पार्वता चांदेवार, रजनी गिऱ्हपुंजे, छाया चव्हाण यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.