शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
3
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
4
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
5
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
6
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
7
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
8
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
9
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
10
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
11
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
12
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
13
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
14
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
15
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
16
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
17
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
18
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
19
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
20
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
Daily Top 2Weekly Top 5

उभ्या बोलेरोला महिंद्रा एक्सयुव्हीची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2022 05:00 IST

बोलेरो पिकअप क्रमांक एमएच ३३-टी २६३६ चा चालक फिर्यादी विलास अर्जुन चौधरी (४५,रा.गांगलवाडी, चंद्रपूर) हे ताब्यातील बेलोरोमध्ये कोंबड्या घेऊन राजनांदगाव येथून वडसाकडे जात असताना त्यांनी देवलगाव येथील आश्रमशाळेजवळ वाहन थांबवून शौचाला गेले होते. या दरम्यान महिंद्र एक्सयुव्ही वाहन क्रमांक जीजे ०५-जेएम ७८६७ चा चालक कनसू छेदीलाल निषाद (२५,रा.लखमापूर, चंद्रपूर) याने ताब्यातील वाहनाने बोलेरोला मागून भरधाव वेगात धडक दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध  :  रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला महिंद्र एक्सयुव्ही गाडीने भरधाव वेगात मागून ध़डक दिली. नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत देवलगाव जवळ रविवारी (दि.१२) पहाटे ५.३० वाजता दरम्यान हा अपघात घडला असून यामध्ये १ जण जखमी झाले.प्राप्त माहितीनुसार, बोलेरो पिकअप क्रमांक एमएच ३३-टी २६३६ चा चालक फिर्यादी विलास अर्जुन चौधरी (४५,रा.गांगलवाडी, चंद्रपूर) हे ताब्यातील बेलोरोमध्ये कोंबड्या घेऊन राजनांदगाव येथून वडसाकडे जात असताना त्यांनी देवलगाव येथील आश्रमशाळेजवळ वाहन थांबवून शौचाला गेले होते. या दरम्यान महिंद्र एक्सयुव्ही वाहन क्रमांक जीजे ०५-जेएम ७८६७ चा चालक कनसू छेदीलाल निषाद (२५,रा.लखमापूर, चंद्रपूर) याने ताब्यातील वाहनाने बोलेरोला मागून भरधाव वेगात धडक दिली. यामध्ये महिंद्रा एक्सयुव्हीमधील चालक कनसू निषाद, छेदीलाल निषाद, सोनू सुरजदिन निषाद, हंसराज छेदीलाल निषाद, रूक्कीनीबाई नयन निषाद, सुमता सोनू निषाद, गजुलिया निषाद, नयन सुरजदिन निषाद, पुनादेवी निषाद, सुनील निषाद व पुनम निषाद (रा. लखमापूर, चंद्रपूर) हे जखमी झाले. तर बेलोरोमध्ये झोपलेला क्लीनर विवेक सुरेश हुड (२६,रा.आरमोरी, गडचिरोली) याला मार लागला नाही.हा अपघात एवढा जबर होता की फिर्यादी विलास चौधरी यांचे बोलेरो वाहन रस्त्याच्याकडेला शेतात शिरले व त्यातील कोंबड्यांचे कंटेनर तुटून पडले. तर महिंद्रा एक्सयुव्ही सुद्धा समोरून चकनाचूर झाली. आवाज येताच फिर्यादी विलास चौधरी धावून आले व त्यांनी क्लीनर सोबत जखमींना वाहनातून बाहेर काढले. तसेच गावकरीही मदतीला आले त्यांनी रूग्णवाहिका बोलावून जखमींना नवेगावबांधच्या ग्रामीण रूग्णालयात पाठविले.  याप्रकरणात पोलिसांनी भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ४२७, मोटारवाहन कायदा १९८८ कलम १८४, ६६, १९२ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

 

टॅग्स :Accidentअपघात