शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सडक अर्जुनी येथील नगरसेवक महेंद्र वंजारी अखेर अपात्र घोषित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 16:44 IST

शासकीय जागेवर अतिक्रमणाची तक्रार : जिल्हाधिकाऱ्यांनी केली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क सडक-अर्जुनी : येथील नगरपंचायतीच्या निवडणुका २०२२ मध्ये पार पडल्या. त्यात नगरसेवक महेंद्र जयपाल वंजारी हे प्रभाग क्रमांक १ मधून निवडून आले होते. त्यांच्या विरोधात शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी महेंद्र वंजारी यांना नगरसेवक पदावरून अपात्र घोषित केले आहे.

नगरसेवक महेंद्र वंजारी यांनी नगरपंचायत सडक अर्जुनी येथील गट क्रमांक १८० मधील १०५ चौरस मीटर शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती औद्योगिक नागरिक अधिनियम १९६५ चे कलम ४४ अन्वये, नगरपंचायतीच्या सदस्य पदावरून अपात्र ठरविण्याची मागणी अर्जदार भोजराज रघुनाथ मसराम यांनी जिल्हाधिकारी प्रजित नायर व नगरविकास विभागाकडे केली होती. या तक्रारीची दखल घेऊन आणि उपविभागीय भूमी अभिलेख सडक अर्जुनी यांनी भूमापन क्रमांक एक संस्थेचे मोजणी करून महेंद्र वंजारी यांनी १०५ मीटर चौरस मीटर शासकीय जागेवर अतिक्रमण केले असल्याचे दस्तऐवज सादर केले. सर्व कागदपत्रे तपासून व पुराव्याच्या आधारावर महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ कलम ४४ नुसार महेंद्र जयपाल वंजारी यांना नगरसेवक पदावरून अपात्र घोषित केल्याचे आदेश जिल्हाधिकारी प्रदीप नायर यांनी सडक अर्जुनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांना १५ ऑक्टोबर रोजी पत्र देऊन कळविले आहे. 

आणखी नगरसेवकांच्या अतिक्रमणाची चर्चा नगरसेवक महेंद्र वंजारी यांना शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी नगरसेवक पदावरून अपात्र घोषित करण्यात आले. त्यांच्यावरील कारवाई- नंतर काही नगरसेवकांनीसुद्धा अतिक्रमण केले असून त्यांच्यात भीती निर्माण झाल्याची चर्चा आहे. तर वंजारी यांच्याप्रमाणेच ज्या नगरसेवकांनी अतिक्रमण केले. त्यांच्यावरसुद्धा अपात्रतेची कारवाई होणार का असा सवाल सडक अर्जुनी शहरवासीयांकडून केला जात आहे. 

टॅग्स :gondiya-acगोंदिया